माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, या मुलाचं वय 14-15 वर्षांचं आहे. कार चालवत असताना त्याला नियंत्रण ठेवता आलं नाही, त्यामुळे पहिले त्याने एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर त्याची कार भिंतीवर आदळली, ज्यामुळे भिंत पूर्णपणे तुटली.
आईने केला मुलाचा बचाव
रहिवाशांनी जेव्हा अल्पवयीन मुलाच्या पालकांना गाडी चालवायला का दिली? अशी विचारणा केली, तेव्हा मुलाच्या आईची प्रतिक्रिया आणखी संतापजनक होती. 'मेरा बेटा तो चलाएगा, जो कर सकते हो कर लो'(माझा मुलगा कार चालवणार, तुम्हाला जे करायचं ते करा) असं उर्मट उत्तर मुलाच्या आईने दिलं आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी मुलाच्या पालकांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.
advertisement
Location :
Dewas,Madhya Pradesh
First Published :
October 14, 2025 9:25 PM IST
मराठी बातम्या/देश/
पोराने अंगावर क्रेटा घातली, भिंत पाडली, हिट ऍण्ड रनचा हादरवणारा Video, आईने तोडले अकलेचे तारे!