TRENDING:

Sharad Pawar : राष्ट्रवादीत चाललंय काय? शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांची दिल्लीत भेट, सोबतच जेवण; चर्चेला उधाण

Last Updated:

संसदेच्या सभागृहातच नव्हे तर कँटिनमध्येही प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार हे शेजारीच बसले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली, 20 सप्टेंबर : भारताच्या नव्या संसद भवनात मंगळवारी अधिवेशनाचे कामकाज शिफ्ट करण्यात आले. त्याआधी जुन्या संसद भवनासमोर देशातील सर्व खासादांरांचे एकत्रित फोटो सेशनही करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची नव्या संसदेत भेट झाली. बराच वेळ ते सोबत होते आणि एकमेकांशी चर्चाही सुरू होती. आता त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
News18
News18
advertisement

संसदेच्या सभागृहातच नव्हे तर कँटिनमध्येही प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार हे शेजारीच बसले होते. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रजनी पाटील, भाजपचे नीरज शेखर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आदी नेते बसले होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एस्थेटिक सिरेमिक कप, 250 रुपयांत करा खरेदी, मुंबईतील हे सर्वात स्वस्त मार्केट
सर्व पहा

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात अधून मधून बोलणंही होत होतं. शरद पवार यांच्या शेजारी बसलेले प्रफुल्ल पटेल त्यांच्यासोबत काही ना काही बोलत होते. कधी कानात तर कधी हळू आवाजात बोलणं सुरू होतं. जेवण संपेपर्यंत शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात हा संवाद सुरू होता. जेवण आटोपून बाहेर पडत असतानासुद्धा प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांच्या मागेच होते.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Sharad Pawar : राष्ट्रवादीत चाललंय काय? शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांची दिल्लीत भेट, सोबतच जेवण; चर्चेला उधाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल