मिळालेल्या माहितीनुसार, शेखपुरा गावातील एका साडेतीन वर्षाच्या मुलाने खेळता खेळता एक रुपयाचे नाणं गिळलं. रात्री झोपेत असताना मुलाला उलटी झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तात्काळ मुलाला सकाळी हिंडौन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणीसाठी एक्स-रे केला आणि मुलाच्या गळ्यात 1 रुपयाचे नाणे अडकल्याचे समोर आले.
सरकारी रुग्णालयात डॉ. मनीष अग्रवाल यांनी सांगितले की, मुलाच्या गळ्यात नाणे दिसल्यानंतर दुर्बिणीच्या सहाय्याने नाणं नेमकं कुठे अडकलं आहे ते पाहिलं. त्यानंतर 4 डॉक्टर आणि तीन वैद्यकीय कर्मचार्यांच्या पथकाच्या मदतीने वेळेत दुर्बिणीच्या सहाय्याने ऑपरेशन न करता हायपोफेरिंगो स्कोप वापरून मुलाच्या घशातून नाणं बाहेर काढण्यात आलं. नाणं घशातून बाहेर काढल्यानंतर मुलाची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
डॉ. पुष्पेंद्र गुप्ता, पीएमओ, सरकारी सामान्य रुग्णालय, हिंडौन सिटी यांनी सांगितले की, सरकारी रुग्णालयात नाणं अडकण्याची ही पहिलीच घटना आहे. जे रुग्णालयातील डॉक्टरांनी कोणतेही ऑपरेशन न करता दुर्बिणीच्या सहाय्याने यशस्वीरित्या नाणं बाहेर काढलं आहे.
हिंडौन शहरातील सरकारी रुग्णालयातील ईएनटी विशेषज्ञ डॉ. मनीष अग्रवाल सांगतात की, एखाद्या लहान मुलाच्या घशात चुकून नाणे किंवा अशी कोणतीही वस्तू अडकली, तर ते ताबडतोब पुढे वाकवावे. त्यानंतर मुलाची छाती एका हाताने दाबली पाहिजे आणि दुसऱ्या हाताने पाठीवर थाप द्यावी. ही प्रक्रिया एक-दोन वेळा केल्यास नाणे घशात अडकण्याची शक्यता असते. तरीही नाणे बाहेर येत नसल्यास, मुलाला ताबडतोब रुग्णालयात नेले पाहिजे.
