केरळमधील कासारगोड जिल्ह्यात एक हृदयद्रावक अपघात समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. व्हिडिओमध्ये आजोबा त्यांच्या घरासमोर कार पार्क करण्याचा प्रयत्न करत होते, त्याचवेळी त्यांचा नातू तिथे खेळत होता. दुर्दैवाने आजोबांना नातू खेळताना दिसला नाही आणि त्यांनी गाडी मुलाच्या अंगावर चालवली.
व्हिडिओमध्ये चिमुकला खेळत कारसमोर येतो. व्हिडिओमध्ये आणखी एक मुलगा दिसत आहे. जो आजोबांना पार्कींगसाठी रस्ता रिकामा करत होता. तेवढ्यात दुसरा चिमुकला खेळत खेळत गाडीसमोर येतो. आजोबांना न दिसल्यामुळे ते कार पुढे घेतात आणि चिमुकला गाडी खाली जातो. शेजारी उभा असलेला मुलगा आजोबांना मोठ्याने ओरडत सांगू लागतो आणि आजोबा गाडी थांबवतात. मग मुलगा लहान चिमुकल्याला गाडीखालून बाहेर काढतो. मग आजोबाही घाबरतात आणि गाडीतून पटकन खाली उतरतात.
कार वळवताना आजोबांनी चुकून मुलावर कार चालवल्याने दुर्दैवी घटना घडली. घटना 10 नोव्हेंबरची आहे. मस्तूल जिशान असं या दीड वर्षाच्या मुलाचं नाव आहे. ही संपूर्ण घटना घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर मुलाला तात्काळ मंगळुरू येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टर त्यांचे प्राण वाचवू शकले नाहीत.