फक्त ३ सोन्याचे दागिने घालण्याची परवानगी
उत्तराखंडमधील जौनसार-बावर क्षेत्रातील कंदाड आणि इद्रोली या दोन गावांनी विवाह समारंभात महिलांनी घालण्याच्या दागिन्यांवर कडक नियम लागू केले आहेत. ग्रामपंचायत कंदाड येथे झालेल्या सामाजिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, कंदाड आणि इद्रोली गावातील महिलांना आता लग्न समारंभ आणि मंगल कार्यांमध्ये सोन्याचे केवळ तीनच दागिने परिधान करण्याची परवानगी दिली
advertisement
नियम मोडल्यास ५०,००० चा मोठा दंड
पंचायतने स्पष्ट सांगितलं की, जर एखाद्या व्यक्तीने या नियमांचे उल्लंघन केले आणि तीनपेक्षा जास्त सोन्याचे दागिने परिधान केले, तर तिच्यावर ५०,००० रुपयांचा मोठा दंड आकारला जाईल. समाजातील शिस्त आणि समानता टिकवण्यासाठी हा नियम अत्यंत कठोरपणे लागू करण्यात आला आहे.
दिखावा कमी करणे हा मुख्य उद्देश
पंचायतने हा निर्णय समाजात वाढणारा दागिन्यांचा दिखावा आणि त्यामुळे वाढणारी आर्थिक विषमता कमी करण्यासाठी घेतला आहे. पंचायतच्या या नवीन नियमानुसार, महिलांना लग्न समारंभात केवळ आवश्यक दागिने जसे की कानातले, नथ आणि मंगळसूत्र हेच परिधान करण्याची परवानगी असेल. याव्यतिरिक्त इतर जास्त सोन्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
गरीब कुटुंबांवरील ताण कमी
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, अनेकदा लग्न समारंभात सामाजिक दबावामुळे कुटुंबे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करतात, ज्यामुळे गरीब कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतो. दागिन्यांच्या दिखाव्यामुळे सामाजिक स्पर्धा वाढत होती. सोनं खूप महाग झालं आहे. आमच्याकडे इतके पैसे नाहीत की आम्ही आमच्या मुला-मुलींच्या लग्नात सोने खरेदी करू शकू. हा निर्णय खूप चांगला आहे, कारण आता गरीब कुटुंबांवरील खर्च करण्याचा दबाव कमी होईल आणि समाजात साधेपणाचा संदेश जाईल." या निर्णयामुळे समाजात समानता आणि साधेपणाची भावना वाढेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
