लाहोपासून जवळच आहे मुरदीकेचा तळ...
लाहोरपासून सुमारे 33 किमी अंतरावर असलेल्या ऐतिहासिक ग्रँड ट्रंक रोडवर असलेले मुरीदके हे लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आहे. त्याला 'मरकज-ए-तैयबा' म्हणतात. या संकुलात मशीद आणि अतिथीगृह बांधण्यासाठी लादेनने 1 कोटी रुपयांची मदत केली होती. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना यामध्ये अजमल कसाबचाही समावेश आहे, त्यांना पाकिस्तानच्या आयएसआयने येथे प्रशिक्षण दिले होते.
advertisement
जैशच्या बहावलपूर मुख्यालयाप्रमाणे हे कॉम्प्लेक्स लष्कर-ए-तोयबाचे वैचारिक, लॉजिस्टिक आणि ऑपरेशनल सेंटर आहे. या ठिकाणी काश्मीर आणि पाकिस्तानमधून तरुणांना आणले जाते आणि दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षित केले जाते.
मोठ्या दहशतवादी अड्ड्यांपैकी एक...
सुमारे 200 एकरमध्ये पसरलेले हे संकुल जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी अड्ड्यांपैकी एक मानले जाते. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात हाफिज सईदने आयएसआय आणि पाकिस्तान बाहेरील सहानुभूतीदार, दहशतवाद्यांच्या निधीच्या मदतीने त्याची स्थापना केली होती.
सॅटेलाइट इमेजनुसार, मरकझ हे आधुनिक सुविधांनी युक्त शहर आहे. त्याचे मुख्य केंद्र एक मशीद आहे, ज्याच्या बाजूला शाळा, प्रशिक्षण केंद्र आणि मोकळी जागा आहे. या कॉम्प्लेक्समध्ये रुग्णालये, कार्यालये, बँका आणि इतर व्यावसायिक गाळे देखील आहेत.