ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पाकमधील दहशतवाद्यांच्या नऊ तळांना लक्ष्य केलं. यामध्ये लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर ठार झाला या चर्चांना उधाण आलंय. जैशचा बहावलपूर इथला तळ भारताच्या हल्ल्यात उद्धवस्त करण्यात आला. बहावरपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय आहे. भारतीय सीमारेषेपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या याच ठिकाणी दहशतवाद्यांना आश्रय दिला जातो.
advertisement
कुटुंबीय ठार, मसूदचं काय झालं?
भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये मसूद अझहर मोठा धक्का बसला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझरच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहावलपूरमधील मदरशावर झालेल्या ऑपरेशन सिंदूर हल्ल्यात जैशचा प्रमुख मौलाना मसूद अझरचे सगळं कुटुंबीय ठार झाले. या हल्ल्यात त्याचा भाऊ आणि मोठी बहीणदेखील ठार झाल्याची माहिती आहे. याबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आला नाही.
मसूद वाचला की खपला?
जैश-ए-मोहम्मद'चा प्रमुख असलेल्या मसूद अझर हा भारताच्या हल्ल्यात ठार झाल्याची चर्चा आहे. मात्र, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने मसूद अझहर आणि हाफिज सईद यांना सुरक्षित ठिकाणी दाखल केल्याचे वृत्त होते. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये मसूद अझर बचावला गेला असल्याचे वृत्त आहे. कंदाहार विमान अपहरण प्रकरणात भारताने तीन दहशतवाद्यांची सुटका केली, त्यात मसूदचा समावेश होता. त्यानंतर त्याने जैशची स्थापना केली आणि भारतविरोधी कारवाया सुरू केल्या.