लष्करी टर्मिनल्सवर डॉक
कराची बंदरात युद्धनौका व्यावसायिक टर्मिनल्सवर डॉक केल्या जात होत्या, जे असामान्य आहे. सहसा युद्धादरम्यान जहाजे लष्करी टर्मिनल्सवर डॉक करतात, परंतु या फोटोंवरून असे दिसून येतंय की पाकिस्तानी नौदलाने त्यांची जहाजे सुरक्षित ठेवण्यासाठी व्यावसायिक क्षेत्रात लपवली होती. इंडिया टुडेने याबाबत वृत्त आणि फोटो MAXAR च्या मदतीने शेअर केला आहे.
advertisement
Photo Courtesy - (India Today/MAXAR)
पाकिस्तानी युद्धनौका इराणी सीमेवर
युद्ध शिगेला पोहोचले असतानाही पाकिस्तानी युद्धनौका इराणी सीमेजवळ लपून बसल्याचे चित्रांमध्ये स्पष्टपणे दिसून येतंय. यावरून पाकिस्तानच्या अपयशाचा पुरावा समोर आला आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानच्या मदतीला इराण धावला होता. अशातच आंतरराष्ट्रीय मंचावर इराणची देखील कोंडी होताना दिसू शकते. काही दिवसांपूर्वी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान पाकिस्तानच्या दौऱ्यावर होते. त्यावरून देखील अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.
पाकिस्तानला धडा शिकवला
दरम्यान, पहलगाम हल्ल्यातील निरपराध नागरिकांच्या मृत्यूचा बदला घेणे आणि पाकिस्तानला एक कडक संदेश देणे हे या ऑपरेशनचे उद्दिष्ट होते. या कारवाईमुळे पाकिस्तानवर लष्करी, राजकीय आणि मानसिक दबाव वाढला. तुमच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याची क्षमता आहे, हे भारताने पाकिस्तानला दाखवून देखील दिलं.