राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना दोन्ही नेत्यांच्या बैठकीतील निर्णयावर भाष्य केले.
ट्रम्प-मोदी भेटीत काय झाले?
26/11 च्या मुंबई हल्ल्यातील महत्त्वाचा आरोपी तहव्वूर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात येणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. दहशतवादी धोक्याचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र काम करतील, असे ते म्हणाले. त्याचवेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, 26/11 चा कट रचणाऱ्यांवर 2008 च्या मुंबई हल्ल्याचा कट रचल्याबद्दल भारतीय न्यायालयांमध्ये खटला चालवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
पंतप्रधान मोदींसोबतच्या पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारतीय बाजारपेठेत अमेरिकन अणु तंत्रज्ञानाचे स्वागत करण्यासाठी भारत आपले कायदे बदलत आहे. ट्रम्प पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि मी ऊर्जा क्षेत्राबाबत एक करार करणार आहोत, ज्यामुळे भारत तेल आणि वायूचा प्रमुख पुरवठादार बनू शकेल.
येत्या काळात भारताला एफ-35 स्टील्थ फायटर ही लढाऊ विमाने मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दोन्ही देशांमध्ये याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.
भारत-चीन सीमावादाच्या मुद्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली. या प्रश्नी माझी काही मदत होऊ शकणार असेल तर मी त्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही देशांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार हा 200 अब्ज डॉलरपर्यंत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लॉस एंजिल्स आणि बोस्टम येथे भारतीय वाणिज्य दूतावास सुरू करणार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
IMEC (इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर) वर बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'आम्ही इतिहासातील सर्वात मोठा व्यापारी मार्ग तयार करण्यासाठी एकत्र काम करण्यास सहमती दर्शवली आहे. हा कॉरिडॉर भारतापासून सुरू होणार असून इस्रायल-इटलीपर्यंत आणि पुढे अमेरिकेपर्यंत असणार आहे.
