पंतप्रधान कार्यालयात उच्चस्तरीय बैठक...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संकटावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात (PMO) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या मार्गदर्शनाखाली एक उच्चस्तरीय बैठकीत खलबतं झाली. 'सीएनएन न्यूज १८' च्या वृत्तानुसार, पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातात अडकलेल्या भारतीय जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारतीय नौसेनेच्या युद्धनौका (Warships) तैनात करण्याच्या पर्यायावर गांभीर्याने विचार सुरू आहे.
advertisement
इराणचं आश्वासन, पण भारताची खबरदारी
इराणने भारत सरकारला आश्वासन दिले आहे की, भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना ते सुरक्षित मार्ग देतील. परंतु, अमेरिका आणि इराणमधील संघर्ष इतका तीव्र झाला आहे की, कोणत्याही क्षणी परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळेच, जर सुरक्षेची स्थिती अधिक बिघडली, तर व्यापारी जहाजांना 'एस्कॉर्ट' (सुरक्षा कवच) देण्यासाठी भारतीय नौसेना होर्मुझमध्ये तैनात केली जाऊ शकते.
भारतीय नौदलाचा 'रक्षक' इतिहास
भारतीय नौदलाने याआधीही अशा संकटात आपली ताकद सिद्ध केली आहे. लाल समुद्रात (Red Sea) हूती विद्रोह्यांनी जेव्हा हल्ले केले, तेव्हा भारतीय नौदलाने धाडसी कामगिरी करत अनेक जहाजांची सुटका केली होती. डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान नौदलाने १८ पेक्षा जास्त घटनांमध्ये तातडीने प्रतिसाद दिला होता. 'आयएनएस सुमित्रा'ने सोमाली चाच्यांच्या तावडीतून दोन जहाजे वाचवल्याचा पराक्रम आजही ताजा आहे.
सध्या होर्मुझमध्ये अडकलेले ११०० नाविक आणि कोट्यवधी रुपयांचे कच्चे तेल सुरक्षितपणे भारतात आणणे, हे मोदी सरकारपुढचे सर्वात मोठे आव्हान आहे.
