दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या स्टेटस रिपोर्टमध्ये पूजा खेडकरचे अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचे मान्य केले आहे. नागरी परीक्षा 2022 आणि 2023 दरम्यान दाखल केलेले प्रमाणपत्र बनावट आहे. पूजा खेडकर यांनी प्रमाणपत्रात नाव बदलले आहे. हे बनावट प्रमाणपत्र महाराष्ट्रातून दिल्याचा दावाही खोटा असल्याचे निष्पन्न झाले.
पूजा खेडकरने या दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर करून युपीएससीच्या निवडीत विशेष सवलत मिळवली होती. कमी गुण मिळाल्यानंतरही तिला दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सूट मिळाल्याने उत्तीर्ण होता आलं होतं. तिने 841 रँक मिळवली होती. आता दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिची प्रमाणपत्रे खोटी असल्याची शक्यता व्यक्त केलीय.
advertisement
Sharad Pawar : मविआच्या जागावाटपाबाबत शरद पवारांचं मोठं विधान, तिसऱ्या आघाडीबद्दल काय म्हणाले?
दरम्यान, पूजा खेडकरने जी प्रमाणपत्रे दिली ती अहमदनगरमधून जारी केली होती आणि ती खोटी असण्याची शक्यता दिल्ली पोलिसांच्या स्टेटस रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आलीय. कारण जेव्हा मेडिकल अथॉरिटीला या प्रमाणपत्रांच्या पडताळणीबाबत विचारले असता त्यांनी अशी प्रमाणपत्रे दिलीच नसल्याचं म्हटलंय. अथॉरिटीने सांगितलं की, पूजा खेडकर ज्या दिव्यांग प्रमाणपत्राचा दावा करतेय ती आम्ही जारी केलेली नाहीत.
सिव्हिल सर्जन ऑफिसच्या रेकॉर्डनुसार दिव्यांग प्रमाणपत्र आम्ही जारी केलेलं नाही. दिव्यांग प्रमाणपत्र खोटं असण्याची शक्यता जास् असल्याचंही मेडिकल अथॉरिटीने म्हटलंय. पूजा खेडकरच्या प्रमाणपत्रावरील नंबर आणि मेडिकल अथॉरिटीचं रेकॉर्ड जुळत नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.