Sharad Pawar : मविआच्या जागावाटपाबाबत शरद पवारांचं मोठं विधान, तिसऱ्या आघाडीबद्दल काय म्हणाले?
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यात मालवणातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मतावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. नितीन गडकरींच्या कामाचंही शरद पवार यांनी कौतुक केलं. तसंच महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबतही त्यांनी मोठं विधान केलं. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून शरद पवार यांनी महायुतीच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला.
advertisement
विधानसभा निवडणुकीच्या तारखेवरून शरद पवार यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, "विधानसभेची मुदत संपते याच्याकडे लक्ष द्यायला हवं. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पर्यंत निवडणूक प्रक्रिया संपेल." विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून बैठका होत आहेत. जागावाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या होतायत. शरद पवार यांनी जागावाटपाबाबत बोलताना सांगितलं की, दोन ते तीन दिवसात महाविकास आघाडी एकत्र बसतील. जागा वाटप बाबत निर्णय होईल. डाव्या विचाराचे काही पक्ष बलस्थाने आहेत त्यांनी. आम्हाला सहकार्य केले त्यांना विचारात घेऊन आम्ही सुरवात करणार आहोत. राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग सुरू आहे याची माहीत मला नाही असंही त्यांनी म्हटलं.
advertisement
सरकार सांगतं एक, त्यांचे सहकारी करतात एक
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी संपावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, एसटी संपाबाबत राज्य सरकारने निर्णय लवकर घ्यावा. सणासुदीचे दिवस आहेत. लोकांना यातना होऊ नयेत. सरकार एक सांगते, त्यांचे सहकारी एक करत आहेत. याचा त्रास सामन्यांना होत आहे. याची नोंद लोक घेतील.
advertisement
महाराष्ट्रात लोकांना बदल हवाय
लोकसभेच्या निवडणुकीत 400 पार म्हणत होते. चंद्राबाबू आणि नितेश यांची मदत नसती तर सरकार आले नसते. लोकांनी त्यांची जागा दाखवली. आता महाराष्ट्रात सुद्धा लोकांना बदल हवा आहे. आमची जबाबदारी आहे आम्ही एकत्र येऊन कष्ट करण्याची आवश्यकता असल्याचं मतही शरद पवार यांनी व्यक्त केलं.
गडकरींच्या कामाचं शरद पवारांकडून कौतुक
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं शरद पवार यांनी कौतुक केलं. ते म्हणाले की,"केंद्रामध्ये जे मंत्री आहेत त्यामध्ये गडकरी स्वतःला कामात गुंतवून घेतात. कामाचा दर्जा राहील याचा प्रयत्न करतात. रस्ते सुधारत आहेत यात गडकरी यांचे योगदान आहे. मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला याबाबत जाणकारांचा सल्ला घेऊन त्यांनी मत व्यक्त केले असेल." स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर पुतळा पडला नसता असं मत नितीन गडकरींनी व्यक्त केलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 04, 2024 10:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Sharad Pawar : मविआच्या जागावाटपाबाबत शरद पवारांचं मोठं विधान, तिसऱ्या आघाडीबद्दल काय म्हणाले?