advertisement

मुंबईकरांनो ऐकलंत का? बोरिवलीहून चर्चगेट गाठण्याआधीच मुंबईहून पुणं गाठाल! कसं होणार शक्य?

Last Updated:

सध्या बोरिवली ते चर्चगेट हा लोकलचा प्रवास साधारण ५० ते ६० मिनिटे घेतो. मात्र, प्रस्तावित बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते पुणे हे अंतर केवळ ४८ मिनिटांत पार होणार आहे

बुलेट ट्रेनने सुपरफास्ट प्रवास (AI Image)
बुलेट ट्रेनने सुपरफास्ट प्रवास (AI Image)
पुणे : मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणाऱ्या प्रवासाचा चेहरामोहरा आता पूर्णपणे बदलणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या सात हायस्पीड रेल कॉरिडॉरमुळे मुंबई-पुणे अंतर आता तासाभराच्या आत आले आहे. या नव्या बुलेट ट्रेनचा वेग इतका असेल की, मुंबईत बोरिवलीहून चर्चगेटला लोकलने जाण्यासाठी जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षा कमी वेळात तुम्ही मुंबईहून थेट पुणे गाठू शकाल.
प्रवासाचे गणितच बदलले!
सध्या बोरिवली ते चर्चगेट हा लोकलचा प्रवास साधारण ५० ते ६० मिनिटे घेतो. मात्र, प्रस्तावित बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते पुणे हे अंतर केवळ ४८ मिनिटांत पार होणार आहे. म्हणजे उपनगरातून दक्षिण मुंबईत पोहोचण्याआधीच तुम्ही दुसऱ्या शहरात पोहोचलेले असाल.
advertisement
महत्त्वाचे बदल -
मुंबई-पुणे प्रवास: आताचा ४ तास (रस्ते/रेल्वे) → बुलेट ट्रेनने ४८ मिनिटे.
पुणे-हैदराबाद प्रवास: आताचा ८ ते १० तास → बुलेट ट्रेनने १ तास ५५ मिनिटे.
वेग: ताशी ३०० ते ३२० किलोमीटर प्रति तास.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर होणारी वाहतूक कोंडी आणि 'वंदे भारत' सारख्या गाड्यांमधील वेटिंग लिस्ट या त्रासातून प्रवाशांची कायमची सुटका होईल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माहितीनुसार, या हायस्पीड कॉरिडॉरमुळे केवळ वेळ वाचणार नाही, तर आयटी, शिक्षण, व्यापार आणि उद्योग या क्षेत्रांना मोठी चालना मिळेल. मुंबई, पुणे आणि हैदराबाद ही तीन महत्त्वाची आर्थिक केंद्रे एकमेकांशी जोडली गेल्याने गुंतवणुकीचे आणि रोजगाराचे नवे दरवाजे उघडणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
मुंबईकरांनो ऐकलंत का? बोरिवलीहून चर्चगेट गाठण्याआधीच मुंबईहून पुणं गाठाल! कसं होणार शक्य?
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement