बेगूसराय : गेल्या काही वर्षांत बिहार राज्यामध्ये जीविका यांनी गरीब कुटुंबांचे उत्पन्न वाढवण्यात आणि विशेषतः महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळेच बिहारमध्ये जीविका हा एक मोठा ब्रँड म्हणून उदयास आला आहे. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या जीविकेशी संबंधित एका महिलेला दिल्लीत आमंत्रित केले आहे. 1 मार्च रोजी चहापानावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी दिल्लीत या महिलेला बोलावले आहे. ही महिला कोण आहे, त्यांचे कार्य काय आहे हे जाणून घेऊयात.
advertisement
बुलबुल देवी असे या महिलेचे नाव आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून निमंत्रण मिळाल्यानंतर बुलबुल देवी खूप उत्साहित आहेत. बुलबुल स्वतः जीविकेसोबत जोडल्या गेल्या असून इतर महिलांना पशुपालनासोबत शेतीचे कौशल्य शिकवून त्यांना स्वावलंबी बनवत आहेत. बुलबुल देवी या एक सामान्य कुटुंबातून येतात. त्या बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातील दियारा परिसरातील बागडोव गावातील रहिवासी आहेत.
2016 मध्ये बुलबुल देवी या जीविकासोबत जोडल्या गेल्या. यानंतर मागील 7 वर्षांपासून त्या विविध काम करत आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न करत आहेत. यासोबतच त्यांनी जीविकाशी जोडलेल्या तब्बल 8 हजार महिलांना पशुपालनाचे कौशल्य शिकवले आहे. यासोबत त्यांनी या महिलांना प्रगतीशील शेती करण्यासाठी पुढे नेले. बुलबुल देवी या त्यांच्या परिसरात सर्वांना बहीण मानल्या जातात. प्रशिक्षित महिलांनीही त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांना त्यांच्या गटातील परिवर्तन समूहाचे अध्यक्ष बनवले. आज त्या बेगुसराय जीविकाच्या रोल मॉडेल दीदी म्हणून ओळखल्या जातात.
महिन्याला पगार तब्बल 80 हजार रुपये, बारावीनंतर लगेच करा हे कोर्स, मग पाहा फायदाच फायदा
या तीन विषयांवर चर्चा -
बुलबुल दीदी यांनी दिल्ली जाण्याच्या आधी लोकल18 च्या टीमशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, लोकांकडे घरे नसणे ही त्यांच्या भागातील सर्वात मोठी समस्या आहे. घर बांधण्यासाठी स्वतःची जमीन नाही. अशा स्थितीत त्यांच्या चर्चेचा पहिला मुद्दा हाच असेल. बिहारमधील बेरोजगारी हा तिचा दुसरा मुद्दा आहे. यावर तोडगा काढण्यासाठीही त्या राष्ट्रपतींशीही बोलणार आहे.
यासोबतच बुलबुल यांनी सांगितले की, ज्या जीविकाच्या माध्यमातून त्यांना ओळख मिळाली आहे, त्यांच्या कामगारांना नियमित कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी, यासाठीही त्या चर्चा करणार आहेत. बुलबुल देवी या 1 मार्च रोजी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.