TRENDING:

Jaisalmer Bus Fire: दिवाळीच्या तोंडावर मोठी दुर्घटना, खासगी बसला लागली आग, 12 प्रवाशांचा जळून कोळसा

Last Updated:

एका खाजगी बसला अचानक आग लागली. या आगीत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जैसलमेर : दिवाळीच्या तोंडावर चाकरमानी गावाकडे निघाले आहे. सर्वत्र रेल्वे, खासगी बसेस आणि शासकीय गाड्यांना प्रचंड गर्दी आहे. अशातच राजस्थानमधील  जैसलमेरमध्ये एक दुर्दैवी अपघात घडला आहे. जोधपूरला जाणाऱ्या एका खाजगी बसला अचानक आग लागली. या आगीत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी आहे. या पैकी ९ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार,जैसलमेर शहरात जोधपूरला जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागली. या बसमध्ये ५७ प्रवाशी प्रवास करत होते.  युद्ध संग्रहालयाजवळ ही बस पोहोचली असता अचानक आग लागली. काही क्षणातच बस पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच  पोलीस, प्रशासन आणि लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना ३ रुग्णवाहिकांमधून जवाहर रुग्णालयात नेण्यात आलं आहे, जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १५ जखमींना दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जोधपूरला रेफर करण्यात आलं आहे.

advertisement

१६ जखमींना १० रुग्णवाहिकांमधून जोधपूरला आणलं आहे. शेवटची रुग्णवाहिका देचूहून निघाली. लवकरच आणखी रुग्णवाहिका पोहोचत आहे. जिल्हाधिकारी गौरव अग्रवाल, पोलीस आयुक्त ओम प्रकाश आणि फर्स्ट मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.एस. जोधा हे सर्वजण रुग्णालयात उपस्थित होते.

कोटा 

advertisement

जैसलमेर बस अपघाताबाबत विरोधी पक्षनेते टिकाराम जूली यांनी महत्त्वपूर्ण निवेदन जारी केलं आहे. या घटनेवरून टीकाराम यांनी सरकारला घेरलं आहे,  'प्रवाशांचा डेटा लपवला जात आहे. चालकाने निष्काळजीपणा  केला आहे.. या घटनांमुळे यंत्रणेचं अपयश उघड झालं आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

६ मृतदेह फ्रीजमध्ये ठेवले

दरम्याान, जोधपूरहून जैसलमेरला डीप फ्रीजर पाठवले जात आहेत. मृतदेह साठवण्यासाठी फ्रीज जैसलमेरला पाठवले जात आहेत. एका फ्रीजमध्ये ६ मृतदेह ठेवता येतात. याशिवाय सिंगल बॉडी फ्रीज देखील पाठवले जातील. मुख्यमंत्री लवकरच जैसलमेरला रवाना होतील, अशी माहिती  मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.एस. जोधा यांनी दिली.

advertisement

हेल्पलाईन नंबर जारी

या घटनेशी संबंधित कोणतीही माहिती किंवा मदत हवी असल्यास हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे.  9414801400,  8003101400  02992-252201 02992-255055 या नंबरवर संपर्क साधू शकतात.

शॉर्ट सर्किटमुळे बसला लागली आग

पोलिसांच्या माहितीनुसार, बसमध्ये एकूण 57 प्रवासी होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. आग इतकी भीषण होती की, काही मिनिटांतच बस पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आणि वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हाधिकारी परसराम, एएसपी कैलाशदान जुगतावत आणि इतर पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जिल्हा प्रशासनाने कुटुंबियांना माहिती देण्यासाठी एक नियंत्रण कक्ष आणि मदत कक्ष स्थापन केला आहे. घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य जलद गतीने सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं तीव्र दु:ख

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीसाठी स्टायलिश कुर्तीज, किंमत 300 रुपये,मुंबईतील या मार्केटमध्ये करा खरेदी
सर्व पहा

मुख्यमंत्री भजन लाल यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी जैसलमेर बस अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी जखमींना सर्वोत्तम उपचार आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जैसलमेरचे जिल्हाधिकारी आणि एसपींशी फोनवरून बोलून अपघाताची संपूर्ण माहिती घेतली आणि मदत कार्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री भजन लाल शर्मा देखील स्वतः जैसलमेरला पोहोचू शकतात आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मदत कार्याचा आढावा घेऊ शकतात.

मराठी बातम्या/देश/
Jaisalmer Bus Fire: दिवाळीच्या तोंडावर मोठी दुर्घटना, खासगी बसला लागली आग, 12 प्रवाशांचा जळून कोळसा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल