जयपूर, 13 ऑक्टोबर : राजा-महाराजांच्या काळात पाण्याचा स्रोत म्हणून विहिरीचा प्रामुख्याने वापर व्हायचा. वास्तूकला विचारात घेऊनच आकर्षक अशा विहिरी निर्माण केल्या जायच्या. राव जोधा या विहिरीपासून राजपूतांनी विहिरी निर्माण करायला सुरुवात केली होती.
राजस्थानातील प्राचीन हवेल्यांच्या परिसरात अनेक भव्य विहिरी आहेत. जयपूरपासून जवळपास 70 किलोमीटर दूर असलेल्या भांडारेज गावात एक अतिशय प्रसिद्ध अशी विहीर आहे. ही तब्बल तीन मजली विहीर दिसायला अतिशय सुंदर दिसते. ती चक्क एक दिवस आणि एका रात्रीत बांधण्यात आली होती. या गावात विहिरींना 'बोरिस' म्हणतात.
advertisement
लग्न जुळत नाहीये? नवरात्रीत होईल समस्या दूर! जाणून घ्या काय आहे मान्यता
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, साधारणतः 1789 साली या विहिरीचं बांधकाम झालं असावं. महत्त्वाचं म्हणजे या विहिरीबाबत एक अतिशय विचित्र कथा सांगितली जाते. एकदा एका लग्नाची वरात भांडारेज गावातून जात होती. वऱ्हाडी या विहिरीजवळ येऊन थांबले. विहिरीच्या आत बांधलेल्या बोगद्यात वरात गेली आणि पुन्हा कधीच बाहेर आली नाही. म्हणूनच या विहिरीला 'भूतांची विहीर' असंदेखील म्हटलं जातं.
अनोखी रामलीला; इथं महिलाच सादर करतात रामायण
ही कथा पूर्वजांकडून ऐकली असली, तरी ती खरी की खोटी हे अद्याप कोणालाही माहित नाही. मात्र विहिरीतील बोगदा हा भांडारेज गावापासून आभानेरी गावाच्या चांद विहिरीपर्यंत जातो. शिवाय ही विहीर म्हणजे प्राचीन शिल्पकलेचा अद्वितीय नमूना आहे. तिची रचना एखाद्या 5 मजली इमारतीसारखी दिसते. तिच्या पायऱ्या विहिरीच्या अगदी तळापर्यंत जातात. तसंच विहिरीवर येणाऱ्या माणसांना उन्हाची झळ बसू नये, यासाठी सावली मिळेल अशी व्यवस्थादेखील इथे करण्यात आलेली आहे. शिवाय विहिरीचा मुख्य दरवाजा भव्य आणि अतिशय सुरेख आहे. इतकंच नाही, तर पूजेसाठी आणि वस्त्र बदलण्यासाठीसुद्धा इथे खास व्यवस्था आहे.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g