अनोखी रामलीला; इथं महिलाच सादर करतात रामायण
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
रामलीलेत 9 महिन्यांच्या तान्ह्या बाळापासून 79 वर्षांच्या वृद्ध महिलेपर्यंत सर्व स्त्रिया सहभागी होतात.
चंदीगड, 13 ऑक्टोबर : लहानपणापासून आपण रामायण ऐकत आलो, वाचत आलो आणि मालिका, चित्रपटांमधून पाहिलंदेखील आहे. शिवाय अनेकांनी लाईव्ह रामलीलासुद्धा पाहिली असेल. चंदीगडजवळील जीरकपूरच्या पीर भागात सध्या चर्चा आहे ती एका अनोख्या रामलीलेच्या. यात रामापासून रावणापर्यंत सर्व पात्र महिला साकारतात. येत्या 15 ऑक्टोबरपासून ही रामलीला पुन्हा सुरू होणार आहे.
विशेष म्हणजे या लीलेत 9 महिन्यांच्या तान्ह्या बाळापासून 79 वर्षांच्या वृद्ध महिलेपर्यंत सर्व स्त्रिया सहभागी होतात. यात एकूण 32 कलाकार असतात. यापैकी अनेक महिला समाजात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. कोणी शिल्पकार आहे, कोणी समाजसेविका आहे, तर कोणी विद्यार्थिनी आहे.
advertisement
या रामलीलेत रामाची भूमिका साकारतात 30 वर्षीय प्रतिभा सिंह, त्या एका बँकेत नोकरी करतात. तर, रावण साकारणाऱ्या रमनदीप कौर या नृत्यांगना आहेत. प्रतिभा सिंह म्हणतात, आम्ही सर्वजणी आमच्या कामातून वेळ काढून रामलीलेच्या तालमीसाठी येतो.
तर, इतर कलाकारांनी सांगितलं की, 'आज पुरुष महिलांच्या भूमिका साकारतात. त्यामुळे महिलांनी पुरुषांच्या भूमिका साकारल्या तर कोणाला काही अडचण नसायला हवी. आज महिला अंतराळात पोहोचली आहे. भारताच्या राष्ट्रपतीपदापासून विविध क्षेत्रांमध्ये महिला अग्रेसर आहेत, हाच विचार लक्षात घेऊन मागील वर्षी या रामलीलेची सुरुवात करण्यात आली.'
Location :
Chandigarh
First Published :
October 13, 2023 6:10 AM IST