इथं कार्यक्रमात भेट म्हणून देतात पोपट! कारणही आहे खास
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ऑस्ट्रेलियन पोपट हे दिसायला फार आकर्षक असतात. त्यांचा आवाजही मधुर असतो. त्यांच्या असण्याने घरात एक सकारात्मक ऊर्जा जाणवते, असं म्हणतात.
शक्ती सिंह, प्रतिनिधी
कोटा, 12 ऑक्टोबर : आपण वाढदिवसाला, लग्नाला किंवा अगदी कोणत्याही कार्यक्रमाला गेलो की सोबत गिफ्ट घेऊन जातो. हे गिफ्ट म्हणजे एखादा दागिना असू शकतो, कपडे असू शकतात किंवा फार फार तर आपण पैसे देतो. कधीतरी एखादं पेट गिफ्ट करतो. परंतु एका ठिकाणी मात्र लोक कार्यक्रमात गेल्यावर एकमेकांना पोपटच गिफ्ट म्हणून देतात.
advertisement
हे ठिकाण आहे राजस्थानचं कोटा. इथले गिफ्ट दुकानदार रऊफ खान सांगतात की, आमच्या दुकानातून अगदी लग्नासाठीसुद्धा लोक पोपट घेऊन जातात. ऑस्ट्रेलियन पोपटाला आणि रंगीबेरंगी चिमण्यांना विशेष मागणी असते. तसंच काहीजण कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांचीही निवड करतात. काही कार्यक्रम नसला तरीही लोक घरी ठेवण्यासाठी पोपटांची आणि पाळीव प्राण्यांची मागणी करतात.
advertisement
आहे धार्मिक महत्त्व
दुकादारांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन पोपट हे दिसायला फार आकर्षक असतात. त्यांचा आवाजही मधुर असतो. त्यांच्या असण्याने घरात एक सकारात्मक ऊर्जा जाणवते. म्हणूनच त्यांची किंमत असते 400 रुपये.
त्याचबरोबर ते म्हणाले, घरात एखादा पक्षी किंवा प्राणी असेल तर वातावरण आनंदी राहतं. शिवाय घरातील लोकही कमी आजारी पडतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात पोपट असेल, तर आपल्या कुंडलीतील राहू, केतू आणि शनीचा दुष्परिणाम कमी होतो. तसंच त्या घरातील आकस्मित मृत्यू योगही टळतो, असं दुकानदार म्हणाले.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Kota,Rajasthan
First Published :
October 12, 2023 10:14 PM IST