ऑक्टोबर महिन्यात खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी, दुर्मिळ योग अनुभवण्याची संधी

Last Updated:

ऑक्टोबर महिना हा खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून विशेष असणार आहे.

+
News18

News18

नागपूर, 12 ऑक्टोबर : अंतराळात प्रत्येक क्षणाला कुठली तरी खगोलीय घटना घडत असते. या घटनाकडे जगभरातील शास्त्रज्ञांसह खगोलप्रेमी, अभ्यासाकांचे लक्ष असुन या सर्व गोष्टींचा मानवी जीवनावर देखील परिणाम होत असतात. सध्या सुरू असलेला ऑक्टोबर महिना हा खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून विशेष असणार आहे. कारण या एकाच महिन्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या दोन्ही घटना अनुभवता येणार आहेत.
येत्या 14 ऑक्टोबर रोजी पितृपक्ष अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण तर 28 ऑक्टोबर रोजी चंद्रग्रहण आहे. 14 ऑक्टोबरचे हे ग्रहण या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण असेल आणि या ग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हणतात. 14 ऑक्टोबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसले तरी 28 ऑक्टोबरचे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसेल. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून बघण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार असल्याची माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि 'स्काय वॉच ग्रुप'चे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
advertisement
ऑक्टोबर महीन्यातील खगोलीय घटना
अंतराळात घडणाऱ्या लहान सहान घटनांकडे जगभरातील शास्त्रज्ञ, खगोल अभ्यासक मोठ्या बारकाईने लक्ष देऊन असतांत, कारण या लहान सहान गोष्टींचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मोठा परिणाम होत असतो. असे असले तरी सर्वसामान्यांच्या दृष्टीने या घटनांकडे मोठ्या कुतुहलाने बघितले जाते. सध्या सुरू असलेला ऑक्टोबर महिना अशाच काही खगोलीय गोष्टींनी परिपूर्ण असणार आहे. कारण या एकाच महिन्यात अंतराळातील अभूतपूर्व असे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण अनुभवता येणार आहे.
advertisement
परंतु हे ग्रहण भारतातून दिसणार नाही
14 ऑक्टोबर रोजी जगातील उत्तर-मध्य आणि दक्षिण अमेरिका, अमेरिका, मेक्सिको, कोलंबिया आणि ब्राझील येथून हे ग्रहण कुठे कांकनाकृती किंवा खग्रास दिसणार आहे, परंतु हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सकाळी 8.33 वाजता सुरू होऊन 2.26 वाजता संपेल.हे ह्या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण असेल. ह्या पूर्वी 20एप्रिल रोजी आंशिक सूर्यग्रहण घडले होते.
advertisement
28 ऑक्टोबरचे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून बघण्याची संधी
28 ऑक्टोबर रोजी रात्री घडणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारत, महाराष्ट्रातून दिसेल. ह्या पूर्वी 5 मे रोजी छायाकल्प चंद्रग्रहण झाले होते. 28 ऑक्टोबर चे ग्रहण वर्षातील शेवटचे ग्रहण असेल. हे ग्रहण जगातील युरोप, आशिया, आष्ट्रेलिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतुन दिसेल. ग्रहणाची सुरुवात रात्री 1.05 मिनिटाने सुरुवात होईल,ग्रहण मध्य 1.44 तर ग्रहण 2.22 वाजता संपेल. आंशिक ग्रहणाचा चंद्र केवळ 10 टक्के झाकला जाईल.
advertisement
चार उल्कावर्षाव
9 ऑक्टोबरला 'ड्राकोनिड' उल्कावर्षाव, 18 ऑक्टोबरला 'जेमिनिड' उल्कावर्षाव, 22 ऑक्टोबरला 'ओरिओनीड' उल्कावर्षाव, 25 ऑक्टोबरला 'लिओनीड' उल्कावर्षाव अशा ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर खगोलीय घटना पाहण्याची संधी अनेक वर्षांनंतर आल्याचे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
ऑक्टोबर महिन्यात खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी, दुर्मिळ योग अनुभवण्याची संधी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement