1 किलो तूपाची किंमत 2 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे खास

Last Updated:

इथं एकदा खरेदी केल्यावर ग्राहकांना इतर ठिकाणच्या तूपाची चव जणू आवडेनाशी होते.

इथं 31 लिटर दूधापासून 1 किलो तूप बनवलं जातं.
इथं 31 लिटर दूधापासून 1 किलो तूप बनवलं जातं.
पीयूष शर्मा, प्रतिनिधी
मुरादाबाद, 12 ऑक्टोबर : हिंदू धर्मात गायीला देवता मानलं जातं. दूधापासून गोमूत्रापर्यंत सारंकाही आपल्यासाठी उपयुक्त असतं. आयुर्वेदात गायीच्या दूधापासून बनवलेल्या तूपालाही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ते कितीही महागडं असलं तरी ग्राहक विकत घेतात.
गुजरातच्या राजकोटमध्ये गोंडल गोशाळेत तर 3500 रुपयांपासून 2 लाख रुपये प्रति किलोपर्यंत तूप मिळतं. खरंतर शुद्ध तूपाच्या शोधात ग्राहक या दुकानापाशी येऊन थांबतात आणि महागड्या किंमतीत तूप विकत घेतात. शिवाय इथं एकदा खरेदी केल्यावर ग्राहकांना इतर ठिकाणच्या तूपाची चव जणू आवडेनाशी होते. असं काय असतं या तूपात पाहूया.
advertisement
रमेशभाई रुपारेलिया हे गोंडलमध्ये जतन संस्थान नामक संस्था चालवतात. त्यांच्या गोशाळेत 200हून अधिक गायी आहेत. ते या गायींचं दूध विकत नाहीत, तर त्यापासून तूप, ताक बनवतात. यामध्ये विविध औषधी वनस्पतींचादेखील समावेश केला जातो. म्हणूनच या तूपाला लाखोंची मागणी मिळते.
advertisement
या तूपात ज्या औषधी वनस्पतीचं औषध मिसळलं जातं, त्याची किंमत आहे प्रति किलो 6 लाख रुपये. त्यामुळेच तूपाची किंमत वाढते. शिवाय त्यामुळे ग्राहकांचं आरोग्य निरोगी राहतं. दरम्यान, 31 लिटर दूधापासून 1 किलो तूप बनवलं जातं. त्याची पॅकिंग आणि घरोघरी जाऊन पोहोचवणाऱ्या 140 कुटुंबांना रमेशभाई रुपारेलिया रोजगार दिला आहे. मागील 15-17 वर्षांपासून ते हा व्यवसाय करत आहेत.
मराठी बातम्या/Food/
1 किलो तूपाची किंमत 2 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे खास
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement