TRENDING:

पुण्याचा शांतनु नायडू आहे रतन टाटांचा PA, त्याचा पगार आणि संपत्ती जाणून बसेल धक्का

Last Updated:

खरं तर, रतन टाटांसोबत गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक मुलगा पाहिला असेल. आज आपण या मुलाबद्दल बोलणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 28 मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आता 85 वर्षांचे आहेत. मात्र आपली सर्व कामे ते स्वत: करतात, पण या काळात त्यांना कोणाचा तरी सहवास हवाच असतो. 'टाटा ग्रुप'ला मोठ्या उंचीवर नेण्यासाठी रतन टाटा यांनी लग्नही केले नाही. पण वयाच्या या टप्प्यावर जेव्हा त्यांना जवळच्या व्यक्तीची गरज भासते तेव्हा त्यांना जवळचे कोणी नसते. त्याला जिमी नवल टाटा नावाचा सावत्र भाऊ आहे, तो देखील 85 वर्षांचा आणि अविवाहित आहे.
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
advertisement

खरं तर, रतन टाटांसोबत गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक मुलगा पाहिला असेल. आज आपण या मुलाबद्दल बोलणार आहोत, ज्याचे नाव आहे शंतनू नायडू. हा मुलगा खूपच जास्त ट्रेंड झाला, त्यानंतर तो कोण आणि तो रतन टाटांसोबत कसा? असे प्रश्न देखील लोकांच्या मनात आले. तो रतन टाटा यांचा पर्सनल पीए आहे. त्यामुळे रतन टाटा जिथे जातात तेथे शंतनू त्यांच्यासोबत राहतो.

advertisement

रतन टाटा यांनीही शंतनूसोबत त्यांचा 85 वा वाढदिवस साजरा केला. शंतनू सतत सावलीसारखा त्यांच्यासोबत असतो. त्यामुळे रतन टाटाही त्यांना आपल्या मुलाप्रमाणेच मानतात. टाटा समूहासोबत काम करणारे शंतनू रतन टाटांच्या व्यवसायासोबतच त्यांची गुंतवणूक पाहतात.

पुण्यातील 30 वर्षीय शंतनू नायडू हा एक बिझनेसमॅन, अभियंता, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, लेखक आणि उद्योजक आहेत. शंतनूने अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. 2018 मध्ये शंतनू भारतात परत आला आणि टाटा ट्रस्टच्या अध्यक्षांच्या कार्यालयात उपमहाव्यवस्थापक म्हणून काम करू लागला. टाटा समूहात काम करणारी त्याची कुटुंबातील 5वी पिढी आहे.

advertisement

खरं तर, शंतनू नायडू यांना पाळीव प्राणी खूप आवडतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांच्या गळ्यात चमकणारे पट्टे बांधण्याची मोहीम सुरू केली होती, जेणेकरून त्यांना अपघात होण्यापासून वाचवावे. भटक्या कुत्र्यांसाठी त्यांनी केलेले काम पाहून रतन टाटा इतके प्रभावित झाले की त्यांनी शंतनूला त्यांचा सहाय्यक बनण्याची ऑफर दिली. रतन टाटा यांनाही कुत्रे खूप आवडतात.

advertisement

शंतनू नायडू हे टाटा ट्रस्टमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. या काळात त्यांना दरमहा लाखो रुपये पगार मिळतो आणि त्यांची एकूण संपत्तीही करोडो रुपयांत आहे. शंतनू नायडूला दरमहा सुमारे 7 लाख रुपये पगार मिळतो. सध्या त्याची एकूण संपत्ती 6 कोटी रुपये आहे.

रतन टाटा यांनी शंतनू नायडू यांच्या स्टार्टअप गुडफेलोजमध्ये गुंतवणूक केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्यासाठी हा स्टार्टअप सुरू करण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
पुण्याचा शांतनु नायडू आहे रतन टाटांचा PA, त्याचा पगार आणि संपत्ती जाणून बसेल धक्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल