सीमा हैदर म्हणाली की, आज मी माझ्या घरावर तिरंगा फडकवला असून मी फक्त भारताची आहे. यावेळी सीमाने हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि संधी मिळाल्यास गदर 2 चित्रपट पाहायला नक्कीच जाईन असेही सांगितले. यावेळी सीमा हैदर हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जयच्या घोषणा दिल्या.
मी कोणताही चित्रपट साईन केलेला नाही : सीमा हैदर
advertisement
सीमा हैदर म्हणाली की, मी कोणताही चित्रपट साईन केलेला नाही. मी स्वत:चा एक व्हिडिओ बनवला होता, पण त्यात अमित जानी यांनी मला खोटे सांगितले की ते आमचे वकील एपी सिंग यांनी पाठवले होते. रिपोर्ट्सनुसार, मेरठच्या अमित जानीने सीमा हैदरला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. वास्तविक, अचानक प्रसिद्धी मिळाल्याने सीमा आणि सचिनसह कुटुंबाल कोणतेही काम करता येत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, दोघांनाही एका कंपनीकडून नोकरीच्या ऑफर मिळाल्याच्या बातम्याही सोशल मीडियावर येत आहेत.
वाचा - 'हे' दाम्पत्य असणार पंतप्रधानांचे खास पाहुणे, लाल किल्ल्यावरून आलं बोलावणं
प्रेगन्सींबद्दल सीमा हैदर काय म्हणाली?
याबाबत मी काहीही सांगणार नाही, असे सीमा हैदर म्हणाली. ही माझी वैयक्तिक बाब आहे, मी सांगणार नाही. मला त्याबद्दल बोलायचे नाही, कारण यामुळे नजर लागते. सीमाने सांगितले की, तिला भारतात राहायचे आहे. जर तिला पाकिस्तानात पाठवले तर तिथे मला मारले जाईल, असे तिचे म्हणणे आहे. सीमाला तिच्या मुलांसोबत इथे राहायचे आहे. यासोबतच सीमाला चार मुलांसह हिंदू धर्म स्वीकारायचा आहे.