इमारतीखाली मोठ्या भेगा
चार पदरी रस्त्याच्या बांधकामामुळे इमारतीखाली मोठ्या भेगा पडल्याचे सांगण्यात येत आहे आणि आज सकाळी इमारत कोसळली, तर त्याच्या शेजारील इतर इमारतींनाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकांना भीतीच्या सावटाखाली जगावं लागत आहे. लोक आपली घरं रिकामी करत आहेत. मात्र, प्रशासनाचा कोणताही अधिकारी अद्याप तिथे पोहोचलेला नाही, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय.
advertisement
संसार गुंडाळावा लागला
इमारतीखाली चार पदरी रस्ता बांधला जात असून चार पदरी रस्त्यामुळे इमारत कोसळल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे. शेजारील इतर इमारतींनाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकांना भीतीच्या सावटाखाली जगावे लागत आहे. लोक आपली घरं रिकामी करत आहेत. तर अनेकांना आपला संसार गुंडाळावा लागलाय. मात्र, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वांरवार केला जातोय.
पाहा Video
पुराचा यलो अलर्ट
दरम्यान, मुसळधार पावसामुळे सात जिल्ह्यांमध्ये अचानक येणाऱ्या पुराचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर उर्वरित दहा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. दुसरीकडे, शिमला जिल्ह्यातील रामपूर भागातील सरपारा ग्रामपंचायतीच्या सिक्ससेरी गावात रविवारी रात्री ढगफुटीची घटना घडली.