राजेंद्रची पत्नी संगीता ही गावातल्या पंचायतीत संगणक ऑपरेटर होती. संगीता सोशल मीडियावर आकर्षक फोटो पोस्ट करायची. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात सर्व काही ठीक होते, परंतु हळूहळू या जोडप्यातील वाद वाढू लागले. संगीताची जीवनशैली, उधळपट्टी आणि तिच्या पालकांवरील प्रेमावरून पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडणं व्हायची
हत्येचे नियोजन कसे केले?
पोलीस तपासात असे दिसून आले की संगीताने 25 ऑक्टोबरच्या रात्री तिच्या पतीला घराबाहेर बोलावले आणि मित्रांची बर्थडे पार्टी असल्याचं सांगितलं. रस्त्यातच संगीता, तिचा भाऊ आणि मित्र यांनी राजेंद्रच्या हत्येचा कट रचला.
advertisement
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते की संगीताच्या भावाची गाडी पुढे जात होती, तर संगीता आणि तिचा पती राजेंद्र हे दुचाकीवरून मागून जात होते. एक निर्जन परिसर आढळल्यानंतर त्यांनी दुचाकी थांबवली. त्यानंतर, दरोड्याच्या बहाण्याने राजेंद्रवर अनेक वेळा चाकूने वार करण्यात आले. पण, अचानक त्यांना तिथे दुसरी बाईक दिसली तेव्हा आरोपी पळून गेला.
संगीता राजेंद्रला घेऊन रुग्णालयात
संगीताने स्वतः गंभीर जखमी झालेल्या राजेंद्रला रुग्णालयात नेले आणि अश्रू ढाळत पोलीस आणि कुटुंबाला खोटी कहाणी सांगितली. कुटुंबाला खात्री पटली. पण, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर पोलिसांना संशय आला. तीन दिवसांनंतर, पोलिसांनी संगीता आणि तिच्या भावाला रुग्णालयाच्या आवारातून अटक केली.
राजेंद्रची 20 दिवस मृत्यूशी झुंज
जवळजवळ 20 दिवस आयुष्यासोबत झुंज देत राहिल्यानंतर, राजेंद्रचा रुग्णालयात मृत्यू झाला. कुटुंबाने त्याच्या उपचारावर अंदाजे 11 लाख रुपये खर्च केले होते. 'आम्ही संगीताच्या जातीबद्दल किंवा तिच्या माहेरी कुटुंबाबद्दल कधीही चर्चा केली नाही. आमच्या भावाला आनंदी ठेवण्यासाठी आम्ही सर्व काही स्वीकारले. पण तिने आमच्या भावाची हत्या केली', असं राजेंद्रची बहीण म्हणाली आहे.
म्हैसूरचे एएसपी नागेश म्हणाले, 'संगीताला तिच्या भावासाठी गाडी खरेदी करायची होती, पण पतीने याला परवानगी देण्यास नकार दिला. यावरून जोडप्यात सतत वाद होत असे. यामुळे पत्नी आणि तिच्या भावाने हत्येचा कट रचला', अशी धक्कादायक माहिती म्हैसूरचे एएसपी नागेश यांनी दिली आहे. याप्रकरणी संगीता आणि तिच्या भावाला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे, तसंच पोलीस पुढील तपास करत आहेत.
