दौसा, 14 ऑक्टोबर : आज 14 ऑक्टोबरला सर्वत्र भारत, पाकिस्तान सामन्याची जोरदार चर्चा आहे. तर, खगोलप्रेमी मात्र आज दिसणाऱ्या वर्षातील अखेरच्या सूर्यग्रहणाच्या प्रतीक्षेत आहेत. हे ग्रहण मेक्सिको, मध्य अमेरिका, कोलंबिया, ब्राझील, इत्यादी पाश्चिमात्य देशांमधून दिसेल. परंतु भारतातून मात्र ते पाहायला मिळणार नाही.
ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व असतं. आजचं सूर्यग्रहण कंकणाकृती असेल जे 8 वाजून 33 मिनिटे 50 सेकंदांनी सुरू होईल. यंदाचं पहिलं सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात झालं होतं, तर दुसरं आज अमावस्येला पाहायला मिळेल. रात्री 2 वाजून 25 मिनिटे 16 सेकंदांनी हे ग्रहण समाप्त होईल. यानंतर 15 दिवसांच्या अंतराने चंद्रग्रहण असेल, जे भारतातून पाहता येईल.
advertisement
परंपरेनुसार करावी देवी दुर्गेची पूजा; नांदेल सुख, समृद्धी, शांती अशी आहे मान्यता!
महत्त्वाचं म्हणजे आजचं सूर्यग्रहण अशावेळी आहे जेव्हा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही. शिवाय सूर्यकिरणांचा चंद्राच्या सर्व कडांवर लख्ख प्रकाश पडतो. त्यामुळे हे ग्रहण पाहणं म्हणजे पाश्चिमात्य देशांतील लोकांसाठी पर्वणीच असेल.
नवरात्री लाभणार! बुध ग्रहाचा तूळप्रवेश सुख घेऊन येणार, यात आहे का तुमची रास?
दरम्यान, साल 3000 पासून आतापर्यंत 11898 सूर्यग्रहण झाले असून पुढच्या वर्षी 8 एप्रिल आणि 2 ऑक्टोबरला सूर्यग्रहण असेल जे भारतातून पाहायला मिळेल. यापैकी पहिलं ग्रहण पूर्ण आणि दुसरं ग्रहण कंकणाकृती असणार आहे.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g