पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, नंदीघोष रथासमोर भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लावलेले बॅरिकेड्स तुटले. त्यामुळे घटनास्थळी ढकलाढकली झाली, यावेळी रथाच्या चाकांजवळ अनेक भाविक एकमेकांवर पडले.
या दुर्घटनेत आतापर्यंत तीन भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेकजण जखमी झाले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. बसंती साहू, प्रेमकांती मोहंती आणि प्रभात दास असं मृत पावलेल्या तिघांची नावं आहे.
advertisement
बसंती साहू या खोर्डा जिल्ह्यातील बोलागड येथील रहिवासी आहेत. तर प्रेमकांती मोहंती आणि प्रभात दास हे बालियांता ब्लॉकमधील अथंतरा गावातील रहिवासी आहेत.तिन्ही मृतदेह पुरी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत.