अनिल आणि हरीश त्यांच्या पत्नी आणि मुलांसह थायलंडला फिरायला गेले होते. दोघांचेही मृतदेह आणण्यासाठी त्यांचे नातेवाईक थायलंडला रवाना झाले आहेत. दोघांच्या पत्नी आणि मुलं सध्या थायलंडलाच आहेत.
दोन्ही मित्र चार-पाच दिवसांपूर्वी थायलंडला फिरायला गेले होते. अनिल त्याची पत्नी आणि दीड वर्षांच्या मुलाला घेऊन आला होता. 1 डिसेंबरच्या रात्री हरीश आणि अनिल त्यांच्या रूममधून हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये उतरले, पण दीड तासानंतरही ते परत आले नाहीत, त्यामुळे दोघांच्या पत्नी त्यांना शोधायला बाहेर पडल्या. स्विमिंग पूलमध्ये दोघं दिसले नाहीत, म्हणून त्यांच्या पत्नींनी हॉटेल स्टाफकडे विचारणा केली. हॉटेल कर्मचाऱ्यांनीही दोघांचा शोध घेतला, पण तरीही ते सापडले नाहीत. अखेर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं, तेव्हा दोघंही स्विमिंग पूलमध्ये बुडताना दिसले, यानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
advertisement
हरीशची पत्नी तसंच अनिलची पत्नी आणि त्यांचा लहान मुलगा अजून थायलंडमध्येच आहेत. हरीश आणि अनिलचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच जोधपूरहून हरीश यांचा मोठा मुलगा आणि अनिल यांचे नातेवाईक थायलंडला रवाना झाले आहेत. अनिलच्या वडिलांना याबद्दल अजून काहीच सांगण्यात आलेलं नाही.
आर्टिस्ट होते हरीश
हरीश देवानी यांचं काम नंबर प्लेट्स आणि नेम प्लेट्स बनवण्याचं होतं, पण ते ग्लास पेंटिंगचे प्रसिद्ध आर्टिस्ट होते. काचेवर रेतीने ब्लास्ट करून आकृती बनवण्याचं कामही हरीश करायचे, त्यामुळे ते परदेशातही लोकप्रिय झाले होते. अनेक परदेशी नागरिक त्यांची ही कला पाहण्यासाठी जोधपूरला यायचे. ट्रान्स प्रिंट काचेवर आकृती काढणारे हरीश हे जगातल्या ठराविक कलाकारांपैकी एक होते. आपल्या या कलेला जगभरात पोहोचवण्यासाठी हरीश परदेशी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासही घ्यायचे.
