डेहराडून : भारताचा समावेश जगातील अशा देशांमध्ये होतो जिथे दरवर्षी रस्ते अपघातात सर्वात जास्त लोकांचा मृत्यू होतो. दरवर्षी रस्ते अपघातांमुळे अनेकांचा मृत्यू होते. अशाच एका व्यक्तीचा अपघतात मृत्यू झाला होता. यानंतर या व्यक्तीच्या कुटुंबीयांनाकडून एक अनोखे आणि कौतुकास्पद कार्य केले जात आहे. नेमकं ते काय कार्य करतायेत, हे जाणून घेऊयात.
advertisement
उत्तराखंडमधील डेहराडून येथे एका रस्ते अपघातात आपल्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाला होता. यानंतर या कुटुंबातील दोन बहिणींनी एक अनोखी आणि कौतुकास्पद मोहीम हाती घेतली आहे. इशिता आणि अंजली अशी यांची नावे आहेत. या दोघांनी मिळून 'श्रद्धांजली' नावाची एनजीओ सुरू केली आहे. याद्वारे त्या लोकांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक करत आहे. या एनजीओचे वैशिष्ट्य म्हणजे 10-12 वर्षे वयोगटातील शाळकरी मुले त्यात स्वयंसेवक म्हणून जोडले गेले आहेत.
श्रद्धांजली फॉर रोड सेफ्टी -
श्रद्धांजली फॉर रोड सेफ्टीची संस्थापिका इशिताने सांगितले की, 2003 मध्ये झालेल्या एका अपघाताने आमचे संपूर्ण कुटुंब हादरले. माझे काका सुशील मायखुरी यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हाच आम्ही दोघी बहिणींनी संकल्प केला की, त्या मोठ्या झाल्यावर लोकांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक करतील. आणि आता आम्ही त्या दिशेने कार्य करत आहोत.
वाहतूक नियम पाळा -
2018 मध्ये इशिता आणि तिची अंजलीने एनजीओची स्थापना केली यानंतर 2021 पासून कार्य सुरू केले. आता दोघेही शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन रस्ता सुरक्षेशी संबंधित कार्यक्रम घेतात. विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगतात. झेब्रा क्रॉसिंग, लाल दिवा आणि फूटपाथ यासह वाहतुकीचे सर्व नियम लोकांना माहीत असावेत, हा आमचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. डेहराडूनच्या मुख्य चौकात त्या लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतात. इशिता आणि अंजली प्राथमिक शाळांना भेट देऊन मुलांना जागरूक करत आहेत.
डेहराडूनच्या प्राथमिक किद्दुवालाची विद्यार्थिनी पल्लवी यमराजाच्या वेषात रस्त्यावर उतरली. तिने सांगितले की, ती 12 वर्षांची आहे आणि पाचवीत शिकते. जर लोकांनी त्यांनी वाहतूक नियमांचे पालन केले नाही तर यमराज त्यांना घेऊन जातील, असा संदेश देण्यासाठी तिने ही वेशभूषा केली. लोकांना जागरुक करण्यासाठी ते कार्य करत आहेत.
मद्यपान करून वाहन चालवू नका, हेल्मेट घाला
टीम श्रद्धांजलीमधील स्वयंसेवक अक्षित सांगतो की, तो लोकांना रस्ता सुरक्षेशी संबंधित नियमांचे पालन करायला लावण्यासाठी जनजागृती मोहिमेत सहभागी झाला आहे. एकदा तो रस्त्यावर गाडी चालवत असताना अचानक एक कार त्याच्या दिशेने वेगाने आली आणि तो थोडक्यात बचावला. चालक दारूच्या नशेत होता. म्हणूनच आम्ही जास्तीत जास्त लोकांना मद्यपान करून वाहन चालवू नये यासाठी जागरूक करण्याचा प्रयत्न करतो. हेल्मेट घाला आणि वेगाने गाडी चालवू नका, असा महत्त्वाचा संदेश ते देत आहेत.
success story : बाप करतो शेती, पोरानं घेतली भरारी, पायलट होत कमावलं नाव, प्रेरणादायी कहाणी
तुम्हालाही टीम श्रद्धांजलीचा भाग व्हायचे असेल आणि रस्ता सुरक्षेबाबत लोकांमध्ये जागरूकता आणायची असेल, तर तुम्ही 6397501255 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा shradhanjali.sushil@gmail.com वर मेल करू शकता.