success story : बाप करतो शेती, पोरानं घेतली भरारी, पायलट होत कमावलं नाव, प्रेरणादायी कहाणी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
कोरोना काळात त्याला दिल्लीतून घरी परतावे लागले होते. यादरम्यान, तो दोन वर्ष घरीच होता. मात्र, जो मेहनत करतो, त्याला ईश्वर नक्कीच साथ देतात, असे म्हटले जाते.
मोहित भावसार, प्रतिनिधी
शाजापुर : असं म्हणतात की, जिथं इच्छा असेल तिथे मार्ग दिसतोच. एका शेतकऱ्याचे मुलाने हे सिद्ध करुन दाखवले आहे आणि आता हा शेतकरीपूत्र चक्क पायलट झाला आहे. अत्यंत कठीण परिश्रम करत या तरुणाने हे यश मिळवले आहे. आपल्या कोणत्याही संकटांचा त्याने धैर्याने सामना केला. जाणून घेऊयात, या तरुणाची यशस्वी प्रेरणादायी कहाणी.
advertisement
करण असे या तरुणाचे नाव आहे. करण हा मध्यप्रदेश राज्यातील शाजापूर जिल्ह्याच्या पिंदोनिया गावातील रहिवासी आहे. आता तो शाजापूरचा पहिला परवानाधारक पायलट बनला आहे. शेतकरी कमलेश यांचा मुलगा करण याने आपले 12वीचे शिक्षण एमजी कॉन्व्हेंटमधून पूर्ण केले. यानंतर नागपूर येथून एव्हिएशनमध्ये डिप्लोमा करुन मुंबई विद्यापीठात त्याने एव्हिएशनमध्ये बीएससीचे शिक्षण पूर्ण केले. याठिकाणी त्याला पायलट ट्रेनिंगबाबत पूर्ण प्रक्रिया माहिती झाली. यानंतर तो पुढील शिक्षण आणि पायलट प्रशिक्षणाच्या परीक्षेसाठी दिल्लीला गेला. याठिकाणी सर्व परीक्षा पास केल्यानंतर त्याने मध्यप्रदेश फ्लाईंग क्लब इंदूर येथून उड्डाण प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
advertisement
कोरोना काळात त्याला दिल्लीतून घरी परतावे लागले होते. यादरम्यान, तो दोन वर्ष घरीच होता. मात्र, जो मेहनत करतो, त्याला ईश्वर नक्कीच साथ देतात, असे म्हटले जाते. त्यामुळे 2022 मध्ये करणने पुन्हा प्रयत्न सुरू केले. मध्य प्रदेश फ्लाइंग क्लब, इंदूरच्या प्रवेश परीक्षेसाठी त्याने अर्ज केला. याठिकाणी त्याची निवड झाली आणि करणने सेसना 172 (सिंगल इंजिन) आणि बीच बॅरन G-58 (मल्टी-इंजिन) विमानांचे प्रशिक्षण घेतले. कॅप्टन मंदार महाजन (CFI), मध्य प्रदेश फ्लाइंग क्लब, इंदूरच्या मार्गदर्शनाखाली 200 तासांचे उड्डाणाचे प्रशिक्षण घेऊन त्याने व्यावसायिक पायलट परवाना मिळवला.
advertisement
शेतकरी कुटुंबातून येतो करण -
करणचे वडील शेतकरी आहे. तसेच शेती करुन ते आपल्या कुटुंबीयांचे पालनपोषण करत आहेत. करणने सांगितले की, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. मात्र, तरीसुद्धा माझ्या वडिलांनी मला मेहनत करुन चांगल्या शाळेत पाठवले. आज त्यांच्या आशीर्वादाने मला व्यावसायिक पायलटचा परवाना मिळाला आहे. काही महिन्यांत माझी कंपनीत निवड होईल आणि मी आकाशातही उड्डाण घेणार आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. दरम्यान, त्याच्या या यशानंतर सर्वत्र कौतुक होत आहे.
Location :
Shajapur,Madhya Pradesh
First Published :
February 13, 2024 8:00 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
success story : बाप करतो शेती, पोरानं घेतली भरारी, पायलट होत कमावलं नाव, प्रेरणादायी कहाणी