TRENDING:

Budget 2026 : तब्बल 75 वर्षांची परंपरा होणार खंडित, निर्मला सीतारामण यांनी घेतला मोठा निर्णय!

Last Updated:

Union finance minister nirmala sitharaman budget 2026 speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या काही वर्षांत बजेटच्या स्वरूपात आणि परंपरांमध्ये अनेक क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. अशातच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Union Budget 2026 Speech: आगामी आर्थिक वर्ष 2026-27 साठी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आज लोकसभेत मांडलं जाणार आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी सीतारमण यांना दही-साखर खाऊ घातली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 11 वाजता संसदेत हा अर्थसंकल्प सादर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या काही वर्षांत बजेटच्या स्वरूपात आणि परंपरांमध्ये अनेक क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. अशातच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
 nirmala sitharaman change in speech of budget 2026
nirmala sitharaman change in speech of budget 2026
advertisement

दशकानुदशके चालत आलेली पद्धत बदलणार

परंपरेनुसार, अर्थसंकल्पीय भाषणाचा भाग 'A' हा नेहमीच अधिक सविस्तर आणि महत्त्वाचा मानला जात असे. मात्र, आज मांडल्या जाणाऱ्या या बजेटमध्ये ही दशकानुदशके चालत आलेली पद्धत बदलणार असल्याचे संकेत सरकारी सूत्रांनी दिले आहेत. आतापर्यंतच्या भाषणांमध्ये भाग 'A' मध्ये वित्तीय घोषणा, आर्थिक आकडेवारी आणि सरकारी योजनांच्या तरतुदींचे वर्चस्व असायचे. दुसरीकडे, भाग 'B' हा केवळ संक्षिप्त धोरणात्मक विधाने आणि समारोपाच्या टिप्पणीपुरता मर्यादित असायचा. मात्र, यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या प्रक्रियेत मोठी रिफॉर्म करण्याची तयारी दर्शवली असून भाग 'B' ला अधिक महत्त्व दिलं जाणार आहे.

advertisement

अर्थमंत्र्यांचा नवा पॅटर्न

यावेळच्या सादरीकरणात भाग 'B' हा भाषणाचा मुख्य केंद्रबिंदू असेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये धोरणात्मक निर्णय, कर रचनेतील बदल आणि भविष्यातील विकासाचा रोडमॅप अत्यंत तपशीलवारपणे मांडला जाईल अशी अपेक्षा आहे. अर्थमंत्र्यांनी मांडलेला हा नवा पॅटर्न नेमका कसा असेल, याबद्दल आता राजकीय आणि आर्थिक वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

advertisement

उद्योगांना काय फायदा होईल?

दरम्यान, या बदलामुळे अर्थसंकल्पीय भाषणाची लांबी आणि त्यातील विषयांची मांडणी बदलण्याची चिन्हे आहेत. सामान्यतः भाग 'B' मध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या प्रस्तावांचा समावेश असतो. यंदा हे प्रस्ताव अधिक सविस्तरपणे मांडून त्यातून सर्वसामान्यांना आणि उद्योगांना काय फायदा होईल, यावर सरकारचा अधिक फोकस असणार असल्याचं समजतंय.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांना दिलासा! 15 मिनिटांचा वेळ वाचणार, भिडे पुलावरील काम अंतिम टप्प्यात
सर्व पहा

निर्मला सीतारमण यांचं हे सलग 9वे बजेट असून जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात ते सादर होत आहे. 2019 पासून त्या अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असून, यंदाच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्लोबल ट्रेड आणि इतर आव्हानांच्या पार्श्वभूमीवर हे बजेट देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्तवाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या/देश/
Budget 2026 : तब्बल 75 वर्षांची परंपरा होणार खंडित, निर्मला सीतारामण यांनी घेतला मोठा निर्णय!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल