TRENDING:

Uttarkashi: गावकऱ्यांच्या किंकाळ्या, रडणारे आवाज, खीर गंगामध्ये ढगफुटी, हाहा:काराचा Video

Last Updated:

Kheerganga Landslide: प्राथमिक माहितीनुसार, 50-60 जण बेपत्ता झाल्याची माहिती असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उत्तरकाशी: उत्तराखंडवर सध्या एका मागोमाग एक नैसर्गिक संकटे येत आहेत. आज उत्तरकाशीतील धराली गावात अचानक ढग फुटले. या ढगफुटीने एकच हाहाकार उडाला. अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्याने एकच खळबळ उडाली. नदी किनारी असलेल्या गावात पाणी शिरले. तर, काही इमारती, घरे कोसळली असल्याचे समोर आले. प्राथमिक माहितीनुसार, 50-60 जण बेपत्ता झाल्याची माहिती असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गावकऱ्यांच्या किंकाळ्या, रडणारे आवाज,  उत्तरकाशीतील खीर गंगामध्ये ढगफुटी, हाहा:काराचा Video
गावकऱ्यांच्या किंकाळ्या, रडणारे आवाज, उत्तरकाशीतील खीर गंगामध्ये ढगफुटी, हाहा:काराचा Video
advertisement

ढग फुटी झाल्यानंतर डोंगराचा काही भागही पुरासोबत रूपात खाली आला. ही भयानक घटना पाहताच लोक ओरडू लागले. ढग फुटल्यामुळे खीर गंगेला पूर आले. हर्षिल येथून लष्कर, पोलिस, एसडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.

पुराचे भयानक दृश्य

गावातील उंचावरील भागात उपस्थित असलेल्या लोकांनी घेतलेल्या सुरुवातीच्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये, खीर गंगा अचानक वरून कसा पूर आला आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहात कसे वाहून गेले, पाण्याने संपूर्ण बाजारपेठ वाहून नेली, याचे भयावह दृष्य दिसून आले.

advertisement

व्हिडिओमध्ये दिसणारे दृश्य इतके भयानक होते की त्यामुळे पाहणाऱ्यांच्या पाठीचा थरकाप उडाला. संपूर्ण धारली बाजारपेठेचा मोठा भाग ढिगाऱ्यात रूपांतरित झालेला दिसतो. अनेक दुकाने आणि घरांची छप्परे कोसळली आहेत. या भयानक परिस्थितीमुळे स्थानिक लोक हादरले आहेत.

सुमारे 50-60 जण बेपत्ता असल्याची भीती आहे. पाण्याची पातळी अचानक वाढल्याने ही घटना घडली. संपूर्ण गाव पाण्याखाली गेल्याचे दिसून येत आहे.

पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा...

या घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र, या बचाव कार्यात खराब हवामान अडथळा ठरू शकतो. हवामान विभागाने पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Uttarkashi: गावकऱ्यांच्या किंकाळ्या, रडणारे आवाज, खीर गंगामध्ये ढगफुटी, हाहा:काराचा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल