TRENDING:

100-120 किमी वेगानं भारताच्या दिशेनं संकट, 10,000 वर्ष जुन्या ज्वालामुखीचा भयंकर स्फोट

Last Updated:

इथिओपियातील हेली गुब्बी ज्वालामुखीच्या राखेचे ढग भारतात पोहोचले, DGCAने ऑरेंज अलर्ट जारी केला, अकासा एअर व इंडिगोची विमाने रद्द, प्रदूषणाची चिंता वाढली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतासाठी धोक्याची घंटा आहे, 100-120 च्या स्पीडने भारताच्या दिशेनं नवीन संकट येत आहे. चक्रीवादळासोबत आता हे नवीन संकट आलं आहे. याचा फटका आज पहाटेपासून बसल्याचं दिसलं. भारतातील हवा दूषित झाली. 10 हजार वर्ष जुना ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला आणि त्यानंतर जे घडलं तर भयंकर घडलं. आफ्रिकेतील इथिओपिया देशातून आलेले ज्वालामुखीच्या राखेचे ढग सोमवारी रात्री भारतावरही पसरले आणि यामुळे देशातील हवाई उड्डाणांना याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. १२,००० वर्षांपासून शांत असलेल्या हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक रविवारी दुपारी झाला होता आणि त्याच्या राखेचे ढग ताशी १०० ते १२० किलोमीटरच्या वेगाने राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली-एनसीआर आणि पंजाबवरून पूर्वेकडे सरकले. या धोकादायक परिस्थितीमुळे डीजीसीएने तातडीने हवाई कंपन्यांना महत्त्वाचा सल्ला जारी केला आहे.
News18
News18
advertisement

राखेचे ढग थेट शहरांवर!

सोमवारी संध्याकाळी हे राखेचे ढग राजस्थानमधून थेट भारतात आले. हे ढग हवेत १० किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर असल्याने त्याचा हवेची गुणवत्ता काही अंशी खराब झाली. तर विमान उड्डाणांना मोठा फटका बसला आहे. ज्वालामुखीच्या या राखेत सल्फर डायऑक्साइड, लहान काचेचे कण आणि खडक असल्याने यामुळे आकाश अंधुक दिसू शकतं. IMD चे महासंचालक एम. मोहपात्रा यांनी सांगितले की, शहरांवर याचा परिणाम केवळ काही तासांसाठीच अपेक्षित आहे.

advertisement

DGCA कडून ऑरेंज अलर्ट आणि विमान रद्द

या धोकादायक राखेच्या ढगांमुळे हवाई वाहतुकीवर लगेच परिणाम दिसून आला. अकासा एअर आणि इंडिगो यांसारख्या कंपन्यांना त्यांची अनेक विमाने रद्द करावी लागली किंवा वळवावी लागली. डीजीसीएने तातडीने विमान कंपन्यांसाठी ASHTAM (विमानांना धोक्याची सूचना) जारी करून 'ज्वालामुखी राख ऑपरेशन मॅन्युअल'चे कठोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले. कोणत्याही विमानाला इंजिनच्या कामगिरीत चढ-उतार किंवा केबिनमध्ये धूर/वास जाणवल्यास, तात्काळ माहिती द्यावी अशा सूचना दिल्या आहेत.

advertisement

महाराष्ट्रासह अनेक राज्यांत वाहतूक विस्कळीत

मुंबईतून निघणाऱ्या विमानांसह दक्षिण भारतातून उड्डाण करणाऱ्या अनेक विमानांवर या राखेच्या ढगांचा परिणाम झाला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय विमानांचे मार्ग बदलण्यात आले, ज्यामुळे ती विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून वळवावी लागली. एका विमानतळ अधिकाऱ्याने सांगितले की, 'आज परिणाम कमी असला तरी, मंगळवारी परिस्थिती अधिक बिघडू शकते. जर ही राख दिल्ली आणि जयपूरवर जमा झाली, तर भारतीय हवाई वाहतुकीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी २४ तास परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

advertisement

प्रदूषण तज्ज्ञांचे मत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शरिरासाठी पौष्टिक, हिवाळ्यात बनवा अंबाडीच्या फुलांची चटणी, चव अतिशय टेस्टी
सर्व पहा

या राखेमुळे हवेतील प्रदूषण वाढेल की नाही, याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. हवामान विभागाने (IMD) फारसा परिणाम होणार नाही असे सांगितले असले तरी, एन्व्हायरो कॅटालिस्ट्स या थिंक-टँकचे संस्थापक सुनील दहिया यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, इथिओपियासारख्या दूरवरून आलेली ज्वालामुखीची राख, तसेच पंजाबमधील शेतीचा कचरा आणि कारखान्यांमधून निघणारा धूर या सगळ्यांमुळे या प्रदेशातील प्रदूषणाची पातळी तात्पुरती वाढू शकते. दिल्ली-एनसीआरमध्ये आधीच हवा 'गंभीर' स्तराच्या अगदी जवळ आहे (AQI 382), अशा वेळी राखेचा प्रवेश ही मोठी चिंतेची बाब आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
100-120 किमी वेगानं भारताच्या दिशेनं संकट, 10,000 वर्ष जुन्या ज्वालामुखीचा भयंकर स्फोट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल