TRENDING:

देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार? काय आहे सत्य? सोशल मीडियावर 'त्या' व्हायरल नोटीसने उडाली खळबळ

Last Updated:

लॉकडाऊन म्हटलं की 2020 सालच्या त्या भयावह आठवणी कोणाच्याही मनात ताज्याहोणारच. घराबाहेर पडण्याची बंदी, गोष्टी वेळेवर मिळत नव्हत्या, किंमती वाढलेल्या आणि अनिश्चिततेचे वातावरण...हे तर सहाजिकच आहे. त्यामुळे आता अशी वेळ येऊ नये असंच लोक मनात विचार करत आहेत आणि देवाकडे मागणी करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : विचार करा सकाळची वेळ आहे, लोकांची कामाला जाण्याची धावपळ, तेव्हा तुम्ही चहाचा कप हातात घेऊन मोबाईल उघडलात आणि अचानक व्हॉट्सॲपवर एक अधिकृत वाटणारा मेसेज आला, देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार..... हे वाचताच काळजात धस्स नक्कीच होणार ना?
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

लॉकडाऊन म्हटलं की 2020 सालच्या त्या भयावह आठवणी कोणाच्याही मनात ताज्याहोणारच. घराबाहेर पडण्याची बंदी, गोष्टी वेळेवर मिळत नव्हत्या, किंमती वाढलेल्या आणि अनिश्चिततेचे वातावरण...हे तर सहाजिकच आहे. त्यामुळे आता अशी वेळ येऊ नये असंच लोक मनात विचार करत आहेत आणि देवाकडे मागणी करत आहेत.

या सगळ्यात सध्या सोशल मीडियावर एक नोटीस व्हायरल होत आहे ज्यामध्ये इराण-इस्रायलच्या युद्धामुळे सर्व जगात लॉकडाऊन लागणार अशी माहिती दिली आहे. ही नोटीसपासून संपूर्ण देशात भीतीचं वातावरण पसरलं आहे. तुम्हालाही ही नोटीस आली आहे का किंवा तुम्ही ती पाहिली आहे का?

advertisement

अशोक चक्र, भारत सरकारचे बोधचिन्ह आणि मंत्रालयाचा शिक्का असलेल्या या नोटीसमुळे सामान्य नागरिकच नाही तर अनेक बडे नेतेही चक्रावून गेले. पण या 'वॉर लॉकडाऊन' नोटीसमागचं सत्य काय आहे? हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

सोर्स : सोोशल मीडिया

advertisement

व्हायरल झालेली ती नोटीस पहिल्या नजरेत अगदी सरकारी आदेशासारखीच दिसत होती. त्यात युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लादल्याचा उल्लेख होता. मात्र, जेव्हा काही सुज्ञ नागरिकांनी ती फाईल सविस्तर उघडली, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. त्या कागदपत्राच्या शेवटी मोठ्या अक्षरात 'April Fool' असे लिहिले होते आणि सोबत एक हसणारा इमोजी होता. केवळ थट्टा-मस्करी म्हणून कोणीतरी हा खोडसाळपणा केला, ज्याने हजारो लोकांची झोप उडवली.

advertisement

या अफवेचा जोर इतका वाढला की खुद्द केंद्रीय मंत्र्यांना मैदानात उतरावे लागले. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी 'X' (ट्विटर) वर स्पष्ट केले की, "सरकारच्या स्तरावर लॉकडाऊनचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत."

मंत्री पुरी यांच्या मते, सध्या इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे. भारतातही पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमतींवरून चर्चा सुरू आहे. अशा संवेदनशील काळात लॉकडाऊनची बातमी आल्याने लोकांनी शहानिशा न करता ती खरी मानली.

advertisement

सोर्स : सोोशल मीडिया

पंतप्रधान मोदींच्या एका विधानाचा चुकीचा अर्थ काढून ही अफवा पसरवण्यात आली होती. त्यावर तीन महत्त्वाच्या मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे:

1. किरेन रिजिजू (संसदीय कार्य मंत्री): "पंतप्रधानांनी स्पष्ट सांगितले आहे की घाबरून जाऊ नका. अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, परिस्थितीवर सरकारचे बारीक लक्ष आहे."

2. हरदीप सिंह पुरी (पेट्रोलियम मंत्री): "लॉकडाऊनची चर्चा पूर्णपणे चुकीची आहे. आपण सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून शांत राहणे गरजेचे आहे."

3. निर्मला सीतारमण (अर्थमंत्री): "मी देशाला खात्री देते की, कोविडसारखा लॉकडाऊन पुन्हा होणार नाही. इंधनाची कमतरता भासेल अशा चर्चा केवळ निराधार आहेत."

राजकारणही तापले

या अफवेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. राहुल गांधी यांनी 2020 च्या लॉकडाऊनमधील वेदनांची आठवण करून देत सरकारवर टीका केली, तर मल्लिकार्जुन खर्गे यांनी ऊर्जेचे संकट आणि महागाईवरून चिंता व्यक्त केली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेण आणि गोमूत्रही बिझनेससाठी ठरलं फायदेशीर, महिन्याला 2 लाखांची उलढाल, विनय यांनी करुन दाखवलं!
सर्व पहा

1 एप्रिल म्हणजेच 'एप्रिल फूल'च्या दिवशी अशा अनेक अफवा पसरवल्या जातात. कोणतीही सरकारी नोटीस अधिकृत वेबसाईटवर तपासल्याशिवाय फॉरवर्ड करू नका. अफवा पसरवणे हा कायदेशीर गुन्हा ठरू शकतो.

मराठी बातम्या/देश/
देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार? काय आहे सत्य? सोशल मीडियावर 'त्या' व्हायरल नोटीसने उडाली खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल