पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी होकार दिला, ५ वाजेपासून शस्त्रसंधीही लागू झाली. पण पाकिस्तानची शेपूट वाकडीची वाकडीच राहिली. जम्मू काश्मीर, श्रीनगर, पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा जोरदार ड्रोन सुरू केला. जम्मूमध्ये काही ठिकाणी स्फोटकांचेही आवाज ऐकू आले.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी खुद्द स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याचं ट्वीट करून सांगितलंय. श्रीनगरममध्ये ठिकठिकाणी स्फोटांचा आवाज ऐकू येत आहे, युद्धबंदीचं काय झालं? असा सवालच ओमर अब्दुला यांनी विचारला.
advertisement
विशेष म्हणजे, काही वेळापूर्वीच शस्त्रसंधीचा निर्णय झाल्यामुळे ओमर अब्दुला यांनी या निर्णयाचं आभार मानले होते. "जम्मू काश्मीरमध्ये निर्णय घेतला. आता आमच्या सरकारचं काम आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये जिथे जिथे नुकसान झालं आहे, त्याची पाहणी केली जाईल. नागरिकांना दिलासा दिला जाईल. ज्या ज्या ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला. आम्ही त्यांना परत तर आणू शकत नाही. पण आम्ही त्यांच्या दु:खामध्ये सामील तर होऊ शकतो. जम्मू शहरात आणि परिसरात मोठं नुकसान झालं आहे. पुंछ विमानतळावर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राजौरीमध्येही नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून निधी द्यावा, जेणेकरून लोकांना मदत दिली जाता येईल. विमानतळ मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. तो आता सुरू होईल तर हज यात्रेला लोकांना जाता येईल, अशी प्रतिक्रिया ओमार अब्दुला यांनी दिली होती.
पण, आता पुन्हा एकदा जम्मूमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि ड्रोन हल्ला केला आहे. भारतीय सैन्याकडून संपूर्ण परिसरामध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. बीएसएफचे जवान पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर देत आहे.