जल समाधी म्हणजे काय? का दिली जाते?
सनातन धर्मात मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यातील एक म्हणजे जल समाधी, ज्यामध्ये संताच्या पार्थिव शरीराला मोठ्या दगडांनी बांधून नदीच्या प्रवाहात सोडले जाते.
असे मानले जाते की जल हा पवित्र तत्व आहे आणि त्यात विलीन झाल्याने मोक्ष लवकर प्राप्त होतो. संतांचे शरीर सामान्य व्यक्तींपेक्षा वेगळे मानले जाते कारण ते तप आणि साधनेने परिपूर्ण असते. त्यामुळे त्यांना दहन करण्याऐवजी जल समाधी दिली जाते.
ईडीने माझे 500 ते 700 कोटी जप्त केले; 1 हजार कोटींची संपत्ती सोडून...
महंत सत्येंद्र दास यांनी २० व्या वर्षी संन्यास स्वीकारला होता. ते अयोध्येतील निर्वाणी आखाड्यातील प्रमुख संत होते. राम जन्मभूमी मंदिराचे ते मुख्य पुजारी म्हणून कार्यरत होते. महंत सत्येंद्र दास यांना ३ फेब्रुवारीला ब्रेन स्ट्रोक आला, त्यानंतर त्यांच्यावर संजय गांधी आयुर्विज्ञान संस्थान (SGPGI), लखनऊ येथे उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी ८५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.