इटावा : आज संपूर्ण देशात भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य होते. पण भारतातील हजारो वीर जवानांनी भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. इंग्रजांनी भारत देश सोडून आज इतकी वर्ष झाली आहेत. मात्र, आजही भारतीय रेल्वे इंग्रजांनी तयार केलेल्या नियमांचे पालन करत आहेत. हे नियम कोणते आहेत, हे जाणून घेऊयात.
advertisement
कोणते आहेत हे नियम -
भारतीय रेल्वेला साखळी बांधण्याचा नियम इंग्रजांनी फार पूर्वीच केला होता. मात्र, आजही भारतीय अधिकारी त्या नियमाचे पालन करत आहेत. आज भारतात सुपरफास्ट ट्रेन्स धावत आहेत. इग्रजांनी तयार केलेल्या नियमांनुसार देशभरात रेल्वेच्या बोगीच्या चाकांना साखळी कुलुपाने बांधले जाते. इंग्रजांच्या राजवटीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असूनही आज या नियमांचे पालन केले जात आहे.
उत्तर प्रदेशातील इटावा रेल्वे स्टेशन, सराय भूपत स्टेशन, भरथना असो किंवा आणखी कुठले रेल्वे स्टेशन असो सर्व जागेवर जेव्हा ट्रेनचालक आणि हेल्पर आपली ड्युटी संपवतो तेव्हा तो ट्रेनला लूप लाईनवर उभी करतो आणि मग जातो. त्यानंतर, ट्रेनच्या इंजिनच्या पुढे आणि ट्रेनच्या मागील बाजूस बोगीच्या चाकांना लॉक असलेली साखळी बांधली जाते.
रेल्वे कर्मचारी काय म्हणाले -
रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पद्धत खूप जुनी आहे. मात्र, आता तंत्रज्ञान बदलले आहे. मात्र, तरीही ही व्यवस्था आजही कायम आहे. प्रत्येक स्टेशनवर उभ्या असलेल्या वाहनांना बांधले जाते. इंग्रजांनी हा नियम कोणत्या परिस्थितीत केला असेल, हे सांगता येणार नाही. पण आज भारतीय रेल्वे दिवसेंदिवस आपल्या सर्व विभागांना तंत्रज्ञान, सुरक्षा आणि सुविधांनी सुसज्ज करत आहे.
बालविवाह रोखण्यासाठी केली चॅम्पियनची नेमणूक, छत्रपती संभाजीनगरमधील हा अनोखा उपक्रम तरी काय?
नाव न सांगण्याच्या अटीवर एका रेल्वे कर्मचाऱ्याने सांगितले की, तो बऱ्याच कालावधीपासून रेल्वेत कार्यरत आहे. जेव्हा एखादी मालगाडी स्टेशनवर येते आणि त्या गाडी चालकाची आणि हेल्परची ड्युटी संपते तेव्हा त्या ट्रेनच्या दोन बोगींना कुलूप आणि साखळीने बांधले जाते. सोबतच लाकडाचे तुकडे दोन्ही चाकांना थांबवण्यासाठी लावले जातात.
putrada ekadashi 2024 : कधी आहे पुत्रदा एकादशी?, जाणून घ्या, पुजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व
संपूर्ण देशात आहे हा नियम -
इटावाच्या सराय भूपत रेल्वे स्टेशनचे स्टेशन अधीक्षक एन. एस.यादव यांनी ऑफ कॅमेरा सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे काम केले जाते. हा नियम आत्तापासून नाही तर सुरुवातीपासून आहे. त्यासाठी योग्य अभ्यासही केला जातो. हा नियम संपूर्ण भारतातातील रेल्वेला लागू आहे, असेही ते म्हणाले.