पाणी पुरवठा खंडीत, नागरिकांचे हाल
'24 तास पाणी पुरवठा' या योजनेमुळे मलकापुराची चांगली चर्चा झाली होती. देशभर मलकापुराला नावाजलं गेलं. पण याच योजनेतील प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मागील आठवड्याभरापासून 24 तासांपैकी 6 तास पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. पाणीपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांचे पिण्याचे आणि खर्चाच्या पाण्याचे नियोजन पूर्णपणे ढासळले आहे. कामाच्या वेळीच नेमके पाणी बंद होत असल्याने महिलांचे कामाचेही नियोजन बिघडत आहे. 24 तास पाणी उपलब्ध आहे म्हणून कोणीही पाणी साठवून ठेवत नाही. अचानक पाणी गेल्यावर महिलांची तारांबळ उडते.
advertisement
महावितरण विभागाकडे दाखवले बोट
यासंदर्भात चौकशी करण्यासाठी फोन केला तर बऱ्याचदा जबाबदार कर्मचाऱ्यालाच काही माहीत नसते. नियोजन करणारा कर्मचाऱ्यालाच काही माहीत नसेल तर या योजनेचं काय होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही, असे सांगत पाणी पुरवठा विभागाने महावितरणाकडे बोट दाखवले आहे. 24 तास पाणी पुरवठा हा मागील 15 वर्षांपासून होत आहे. त्यामुळे नागरिक पाणी साठवून ठेवत नाहीत. नेमकं काम सुरू असताना पाणी जात असल्यामुळे कपडे, भांडी, स्वयंपाक करताना महिलांना अडचणींना सामोरे जावे लागते.
हे ही वाचा : गॅस सिलिंडरसाठी ई-केवायसी अनिवार्य; माण तालुक्यातील ग्राहकांना भारत गॅस एजन्सीचे आवाहन
हे ही वाचा : कोल्हापूरकरांनो लक्ष द्या! जिल्ह्यात उद्यापासून 3 दिवस 'ऑरेंज अलर्ट', हवामान विभागाचा इशारा