पुणे येथील पर्यटकांची ‘थार’ (क्र. एमएच १२, एक्सटी १७८८) गाडी किनाऱ्यावर वेगाने स्टंट करत असताना हा अपघात झाला. गाडीचा वेग इतका जास्त होता की, ती उलटली आणि त्यातील काहीजण बाहेर फेकले गेले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. या घटनेमुळे किनाऱ्यावरील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिकांनी व्यक्त केली नाराजी
या प्रकारानंतर स्थानिक ग्रामस्थ तात्काळ मदतीसाठी धावले. त्यांनी जेसीबीच्या मदतीने गाडी किनाऱ्यावर सुरक्षित आणली. मात्र, अशा बेजबाबदार वर्तनामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दापोली, कर्दे आणि हर्णे येथील किनाऱ्यांवर अनेक पर्यटक येतात. मात्र, काही बेपर्वा पर्यटक सूचना आणि नियमांकडे दुर्लक्ष करून समुद्रात धोकादायक स्टंट करतात, ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते.
advertisement
स्थानिकांनी अशा स्टंटबाजी करणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, किनाऱ्यावर सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहतूक नियमांची योग्य व्यवस्था करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे, जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येतील.
हे ही वाचा : डॉक्टर म्हणाले होते आई होणार नाही, पण महिलेने एका वर्षात 4 मुलांना दिला जन्म, हे झालं कसं?
हे ही वाचा : ई पीक पाहणीसंदर्भातील महत्वाची अपडेट! या तारखेपर्यंत करता येणार नोंदणी