डॉक्टर म्हणाले होते आई होणार नाही, पण महिलेने एका वर्षात 4 मुलांना दिला जन्म, हे झालं कसं?

Last Updated:

Pregnancy News : आई होणं हा कोणत्याही महिलेसाठी खूप खास आणि आव्हानात्मक अनुभव असतो, पण ब्रिटनमधील एका महिलेची कहाणी तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

News18
News18
नवी दिल्ली : आपल्या आयुष्यात अनेकदा असे चमत्कार घडतात ज्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. एका  महिलेसोबत असंच काही घडलं की ती प्रसिद्धीच्या झोतात आली. डॉक्टरांनी या महिलेला सांगितलं होतं की ती एका आजारामुळे आई होऊ शकणार नाही. पण नंतर असा चमत्कार घडला की ती 14 महिन्यांत म्हणजे जवळपास एका वर्षातच 4 मुलांची आई बनली.
आई होणं हा कोणत्याही महिलेसाठी खूप खास आणि आव्हानात्मक अनुभव असतो, पण ब्रिटनमधील एका महिलेची कहाणी तुम्हाला आश्चर्यचकित करेल. इंग्लंडमधील रोचडेल येथील रहिवासी असलेल्या शौना ह्यूजेस. 2019 मध्ये तिला एंडोमेट्रिओसिस नावाचा आजार असल्याचं निदान झालं होतं. या आजारात गर्भाशयाच्या अस्तराचं ऊतक पसरतं, ज्यामुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. डॉक्टरांनी सांगितलं होतं की ती कदाचित आई होऊ शकणार नाही, पण नंतर चमत्कार घडला.
advertisement
ज्या शौनाला डॉक्टरांनी ती आई होणार नाही असं सांगितलं त्याच शौनाने एका वर्षातच तब्बल 4 मुलांना जन्म दिला. सलग दोन वर्षांत तिला दोन जुळी मुलं झाली. पहिल्या सोनोग्राफीमध्ये तिला फक्त एकाच मुलाबद्दल सांगण्यात आलं होतं, परंतु जेव्हा जेंडर स्कॅनमध्ये गर्भाशयात दोन बाळे असल्याचं उघड झालं तेव्हा ती थक्क झाली. ऑक्टोबर 2021 मध्ये तिच्या पहिल्या जुळ्या मुलांना फ्रँकी आणि फेंटनला जन्म दिला. फक्त 14 महिन्यांनंतर, डिसेंबर 2022 मध्ये, तिने पुन्हा जुळ्या मुलांना जन्म दिला, ज्यांची नावं लुई आणि लुका ठेवण्यात आली. अशाप्रकारे, शौना एका वर्षातच चार मुलांची आई बनली.
advertisement
शौनाने सांगितलं की तिला दुसऱ्यांदाही सर्व काही नव्याने खरेदी करावे लागलं. ती म्हणाली, "मी पहिल्या जुळ्या मुलांसाठी माझ्या आवडीची सर्व नावं आणि गोष्टी वापरल्या होत्या. मला वाटलं होतं की आता मला आणखी मुले होणार नाहीत, पण जेव्हा मला दुसऱ्यांदा जुळी मुलं झाली तेव्हा मला नावं निवडण्यात अडचण आली. शेवटी, माझ्या आईने इतर जुळ्या मुलांची नावं ठेवली." चारही मुले वयाच्या अगदी जवळ असल्याने, लोक अनेकदा त्यांना चौपट (एकत्र जन्मलेली चार मुले) समजतात. यावर शौनाने विनोदानं म्हटले आहे, "हे कॉपी-पेस्टसारखं आहे.
advertisement
शौना ही सिंगल मदर आहे. मँचेस्टर इव्हनिंग न्यूजशी बोलताना तिने सांगितलं की जेव्हा ती दुसऱ्यांदा गर्भवती होती तेव्हा तिचं तिच्या जोडीदाराशी असलेलं नातं तुटलं होतं आणि ती खूप कठीण काळातून जात होती.  "इतक्या लहान मुलांची एकट्याने काळजी घेणं खूप कठीण आहे.  पण आता तो माझ्या आयुष्याचा एक सामान्य भाग बनला आहे. आपण आई कितीही थकलोअसलो तरी आपण थांबत नाही.", असं ती म्हणाली.
मराठी बातम्या/Viral/
डॉक्टर म्हणाले होते आई होणार नाही, पण महिलेने एका वर्षात 4 मुलांना दिला जन्म, हे झालं कसं?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement