‘वश’ या चित्रपटाच्या यशानंतर निर्मात्यांनी त्याचा सीक्वल बनवण्याचा निर्णय घेतला, आणि आता तो ‘वश विवश लेवल २’ या नावाने प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा तिथूनच सुरू होते, जिथे ‘वश’ची कथा संपली होती. तुम्ही ‘वश’ चित्रपट पाहिला नसेल, पण जर तुम्ही अजय देवगण आणि आर. माधवनचा ‘शैतान’ पाहिला असेल, तर तुम्हाला ही कथा समजून घेणं सोपं जाईल, कारण ‘शैतान’मध्ये ‘वश’चीच मूळ कथा दाखवण्यात आली होती.
advertisement
‘वश’ आणि ‘शैतान’मध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे अभिनेत्री जानकी बोडीवाला आणि तिची दमदार भूमिका.
‘शैतान’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
विकास बहलने दिग्दर्शित केलेला ‘शैतान’ हा चित्रपट मार्च २०२४ मध्ये रिलीज झाला होता. जवळपास ४० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने १५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. या चित्रपटात अजय देवगण, ज्योतिका आणि आर. माधवन यांनी काम केलं होतं. यात आर. माधवनने साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेने सगळ्यांनाच थक्क केलं होतं.
‘वश’च्या सीक्वलचा थरारक ट्रेलर
‘वश विवश लेवल २’ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यात ‘अथर्व’ १२ वर्षांपासून त्याची मुलगी ‘आर्या’ हिच्यावर असलेल्या वशीकरणातून बाहेर पडण्याची वाट बघत आहे. त्याच वेळी शहरात एका शाळेतील मुली अचानक इमारतीवरून उड्या मारत असल्याची बातमी येते. हे ऐकून अथर्वला धक्का बसतो, कारण त्याला कळतं की या मुलींवरही कोणत्यातरी शक्तीचा प्रभाव आहे.
तो त्या शाळेत पोहोचतो आणि ‘प्रताप’च्या धाकट्या भावाला म्हणजेच ‘राजनाथ’ला भेटतो. या सगळ्यामागे राजनाथचा हात असल्याचं त्याला कळतं. ट्रेलरच्या शेवटी जानकी बोडीवाला एका भयानक रूपात दिसते. आता ही कथा पुढे कशी जाते, हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.