आज सकाळी मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस काही नेत्यांनी पक्ष प्रवेश केला. यामध्ये भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील, निशिकांत पाटील, काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी, नांदेडचे माजी खासदार प्रतापराव चिखलीकर, आमदार देवेंद्र भुयार आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
दुसऱ्या यादीत कोणाला संधी
शिरुर - ज्ञानेश्वर कटके
तासगाव - संजयकाका पाटील
advertisement
इस्लामपूर- निशिकांत पाटील
अणुशक्तीनगर- सना मलिक
वांद्रे पूर्व- झिशान सिद्दिकी
वडगाव शेरी - सुनील टिंगरे
लोहा- प्रतापराव चिखलीकर
नवाब मलिक यांना उमेदवारी का नाकारली?
मलिक हे अणुशक्तीनगरमधील विद्यमान आमदार आहेत. मलिक यांच्याऐवजी त्यांची कन्या सना मलिक ही निवडणुकीच्या मैदानात असणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांचा पत्ता कट झाला आहे. नवाब मलिक यांना उमेदवारी न देण्यावरून भाजपने ठाम भूमिका घेतली होती. मलिक हे मविआ सरकारच्या काळात मंत्री असताना विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप आणि दिलेल्या पुराव्यांमुळे नवाब मलिक हे तुरूगांत होते. त्याआधी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदा घेत तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचा धुरळा उडवला होता.
सध्या प्रकृतीच्या कारणास्तव मलिक यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मलिक यांना पु्न्हा उमेदवारी दिल्यास विरोधकांना आयते कोलीत मिळेल. शिवाय त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतील असे अंदाज महायुतीच्या नेत्यांनी बांधला. पण अजित पवार मात्र नवाब मलिक यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र, त्यांना माघार घ्यावी लागली.