गाडीचा मार्ग आणि थांबे
सहा स्लीपर, चार थ्री-टिअर एसी आणि सहा जनरल डब्यांसह ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. या गाडीला हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, बेळंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जत रोड, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डूवाडी आणि सोलापूर यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. यामुळे सांगोला तालुक्यातील प्रवाशांना सोलापूरला जाण्यासाठी आणि येण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
मागणी अखेर पूर्ण
शहीद अशोक कामटे संघटनेने या रेल्वेसेवेची मागणी केली होती. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार प्रणिती शिंदे, चेतनसिंह केदार-सावंत आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही मागणी आता पूर्णत्वास आली आहे. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच झाल्याने, या नव्या रेल्वेमुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांची आणि वकिलांची मोठी सोय झाली आहे.
हे ही वाचा : तुमच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कांतील नावे कसे कमी करायचे? कायदेशीर मार्ग काय?
हे ही वाचा : Pune News : वाहनचालकांनो काळजी घ्या! पुणे-मुंबई महामार्गावरील 'हे' ठिकाण ठरतयं अपघातांचं हॉटस्पॉट