Chanakya Niti: असा सोबती असण्यापेक्षा नसलेला बरा! वेळीच एकमेकांपासून दूर होण्यात शहाणपण
- नीतिशास्त्रात आचार्य चाणक्य म्हणतात, की दुःखी व्यक्तीशी दृढ मैत्री करणं कायम दुःख देणारं असतं. मित्राची परिस्थिती सुधारावी म्हणून अशा व्यक्ती आर्थिक मदतही करतात. त्यामुळे मदत करणाऱ्या व्यक्तीची आर्थिक स्थितीही कमजोर होत जाते. त्यामुळे दुःखी व्यक्ती किंवा गरीब व्यक्तीशी दृढ मैत्री करणं कायम कष्टदायकच ठरतं.
advertisement
- नीतिशास्त्रात आचार्य चाणक्यांनी प्रकांड पंडितांनाही सल्ला दिला आहे. मूर्ख व्यक्तीला कधीही मित्र बनवू नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे. मूर्ख व्यक्तीला उपदेश केल्यास किंवा सल्ला दिल्यास दानाच्या आधारे उपजीविका करणारा पंडितही घोर संकटात सापडू शकतो. अशा स्थितीत मूर्ख व्यक्ती कोणत्याही लाभ-हानीच्या स्थितीत पंडितालाच जबाबदार मानते. तसंच, मूर्ख व्यक्ती आपल्या निर्णयाने पंडिताला धर्मसंकटात आणि आर्थिक संकटात टाकते.
- आचार्य चाणक्य यांच्या मते, दुष्ट आणि चारित्र्यहीन पत्नीचं पालनपोषण करणारी व्यक्ती आयुष्यभर गरीब राहते. अशा व्यक्तींना नशिबाचीही साथ मिळत नाही. अशा व्यक्ती मरेपर्यंत दुःखी आणि गरीबच राहतात. दुष्ट आणि चरित्रहीन स्त्री कधीही कुटुंबाचं भलं करू शकत नाही. ती कायम स्वतःच्याच चांगल्याचा विचार करते. तिचं राहणीमान, खाणं-पिणं या सगळ्या गोष्टी एखाद्या महाराणीसारख्या असतात. अशा पत्नीला सांभाळणाऱ्या पतीची आर्थिक स्थिती कायम तंगीचीच असते.
Chanakya Niti - परफेक्ट नवरा, बॉयफ्रेंड हवाय; मग चाणक्यनीतीतील हा 'मंत्र' लक्षात ठेवा
या तीन प्रकारच्या व्यक्ती कायम गरीब राहतात, असं चाणक्यनीती सांगते. आचार्य चाणक्य हे महान राजनीतिज्ञ आणि कूटनीतिज्ञ होते. त्या काळी अखंड भारताच्या निर्मितीत त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त असंही म्हटलं जातं. मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत आचार्य चाणक्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. त्यांनी सांगितलेल्या नीतीचा वापर करून चंद्रगुप्ताने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चाणक्यांनी अनेक रचना केल्या. त्यांपैकी नीतिशास्त्र खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. त्यातली बहुतांश तत्त्वं आजही लागू पडतात.