विश्वासघात सहन करणार नाही!
नेहमीच लाईमलाईटमध्ये राहणाऱ्या तान्याने नुकतीच मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. गणरायाचे दर्शन घेऊन बाहेर पडताच फोटोग्राफर्स आणि पत्रकारांनी तिला गराडा घातला. याचवेळी तिला नीलम गिरीला अनफॉलो करण्यामागचे कारण विचारण्यात आले. यावेळी तान्याने अतिशय स्पष्टपणे याबाबत तिचे मत मांडले.
advertisement
तान्या स्पष्टपणे म्हणाली, "हो, मी तिला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. शोमधून बाहेर आल्यावर मी नीलमच्या काही मुलाखतींचे क्लिप्स पाहिले. त्यात तिने मला थेट फेक आणि खोटारडी म्हटले होते! तिच्या तोंडून माझ्याबद्दल असे शब्द ऐकून मला प्रचंड वाईट वाटले."
आपली नाराजी व्यक्त करताना तान्याच्या चेहऱ्यावरचा संताप स्पष्टपणे दिसत होता. "मी तिच्यावर खूप विश्वास ठेवला होता. घरात असताना अनेक खासगी गोष्टी तिच्यासोबत शेअर केल्या होत्या. पण तिने माझा विश्वास तोडला. जर ती खरंच मला तिची मैत्रीण मानत असती, तर तिने माझ्याबद्दल अशी निगेटिव्ह मतं सार्वजनिकरित्या व्यक्त करायला नको होती," असे तान्याने बोलून दाखवले.
एकता कपूरकडून मिळाली मोठी ऑफर
तान्या मित्तलने 'बिग बॉस १९' च्या घरात फरहाना भट्ट, नीलम गिरी आणि कुनिका सदानंद यांच्यासोबत एक खास ग्रुप तयार केला होता. तिचा सामना मालती चहर, नेहल चुडासमा, संगीतकार अमाल मलिक आणि अभिनेता गौरव खन्ना यांच्यासोबत अनेकदा झाला होता.
मैत्री तुटल्याच्या या घटनेनंतर तान्या स्वतःला 'एकटी लढणारी योद्धा' मानत आहे. या शोने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. इतकेच नाही तर, प्रसिद्ध निर्माती एकता कपूरनेही तिला तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी साईन केले आहे. परंतु, शो संपल्यानंतर मैत्रीचे हे नाते अशा प्रकारे तुटणे, याने सिद्ध होते की टीव्हीच्या जगातील ड्रामा पडद्यावर आणि पडद्याबाहेरही कधीच थांबत नाही!
