TRENDING:

वन्यजीवांना खायला घालताय? सावधान! खावी लागेल जेलची हवा; इतकंच नाहीतर 'इतक्या' लाखांचा होईल दंड

Last Updated:

Satara News : यवतेश्वर घाटात माकडांना खाऊ घालणे आणि नागासोबत फोटो काढणे, या दोन घटनांनंतर वन्यजीव संरक्षण कायदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वन कायद्यानुसार...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Satara News : यवतेश्वर घाटात माकडांना खाऊ घालणे आणि नागासोबत फोटो काढणे, या दोन घटनांनंतर वन्यजीव संरक्षण कायदा (Wildlife Protection Act) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वन कायद्यानुसार, वन्यजीवांना खायला घालणे किंवा त्यांना घरात पाळणे हा गंभीर गुन्हा आहे आणि त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
Wildlife Protection Act
Wildlife Protection Act
advertisement

काय आहे वन्यजीव संरक्षण कायदा?

वन्यजीव संरक्षण कायदा 1972 साली लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार, कोणताही वन्यजीव घरात पाळल्याचे सिद्ध झाल्यास, दोषी व्यक्तीला तीन ते पाच वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय, वन्यजीवांचा वापर अंधश्रद्धेसाठी करणे किंवा त्यांना पिंजऱ्यात डांबून ठेवणे हा देखील कायद्याने गुन्हा आहे.

वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, कोणत्याही वन्यजीवाला पकडणे, त्याचा पाठलाग करणे, त्याला सापळ्यात अडकवणे किंवा त्याला इजा पोहोचवणे हे गंभीर गुन्हे आहेत. अशा गुन्ह्यांसाठी सहा महिने ते सात वर्षांपर्यंत कारावास आणि दोन हजार ते 50 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

advertisement

वन्यजीवांना खाऊ घालण्याचे दुष्परिणाम

अनेकदा लोक भूतदयेपोटी माकडे, मोर किंवा इतर प्राण्यांना शिजवलेले अन्न, वेफर्स किंवा कोल्ड्रिंक्स देतात. मात्र, हे त्यांच्यासाठी हानिकारक असते. वन्यजीवांनी कच्चे आणि नैसर्गिक अन्न खाणे अपेक्षित आहे. जेव्हा त्यांना सहजपणे आयते अन्न मिळते, तेव्हा त्यांची अन्न शोधण्याची नैसर्गिक क्षमता कमी होते. यामुळे ते मानवी वस्तीकडे आकर्षित होतात आणि मानव-वन्यजीव संघर्ष वाढतो.

advertisement

1960 मध्ये लागू झालेल्या प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि 1860 मधील 428 आणि 429 कलमांनुसार, कोणत्याही प्राण्याला मारणे किंवा त्याला जखमी करणे गुन्हा आहे. त्यामुळे, वन्यजीवांना मदत करण्याच्या प्रयत्नात कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : Dhananjay Munde: पोलिसांना आडनाव लावता येत नाही, हीच सामाजिक समता? धनंजय मुंडेंचा सवाल

advertisement

हे ही वाचा : Mumbai Slum Area : मुंबईतील झोपडपट्टीधारकांसाठी राज्य सरकारचा नवा निर्णय! मिळणार हा मोठा लाभ

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
वन्यजीवांना खायला घालताय? सावधान! खावी लागेल जेलची हवा; इतकंच नाहीतर 'इतक्या' लाखांचा होईल दंड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल