ही सुविधा सुरू करण्यामागे एमएमआरसीचे दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. पहिले म्हणजे प्रवाशांना सोयीस्कर प्रवास आणि दुसरे म्हणजे ‘MetroConnect3 या नवीन अॅपद्वारे डिजिटल तिकीट खरेदीला प्रोत्साहन देणे. म्हणजे आता तुम्ही तिकीट खिडकीच्या रांगेत उभ राहण्याऐवजी मोबाईल वरूनच तिकीट बुक करू शकता. वेळ वाचेल आणि तुमची एनर्जी टिकून राहील.
MetroConnect3 अॅप वापरून Wi-Fi कनेक्ट करण्याचे तीन सोपे पर्याय
advertisement
1)पहिली स्टेप – ‘MetroConnect3’ अॅप डाउनलोड करायचं आणि लॉगिन करायचं.
2) दुसरी स्टेप – मोबाईलच्या वाय-फाय सेटिंगमध्ये जाऊन MetroConnect3 नेटवर्क निवडायचं.
3)शेवटची स्टेप – अॅप उघडून Profile मध्ये जाऊन Connect to Wi-Fi वर टॅप करायचं आणि होय मग तुम्ही नेटवर व्हिडिओ स्ट्रीमिंग, मेम्स शेअरिंग अन् तुमच बरंच काम करू शकता अगदी मेट्रोच्या गाडीमध्ये बसून.
ही सुविधा कन्कोर्स लेवलवर उपलब्ध आहे, म्हणजे तिकीट खिडकीजवळ, जिथे तुम्ही प्रवासाच्या तयारीत असाल, तिथून लगेच कनेक्ट होऊ शकता. एमएमआरसीने प्रवाशांना आवाहन केले आहे की या मोफत वाय-फायचा जास्तीत जास्त वापर करा.