साधारणपणे सोन्याचे दर वाढतात, मात्र सध्या उलट चित्र दिसत आहे. आशियाई बाजारात सोन्याचे दर सुमारे ०.३९ टक्क्यांनी घसरून ५,१५९ डॉलर प्रति औंसवर आले आहेत.
नेमकं कारण काय?
युद्ध सुरू असूनही सोन्याचे भाव का घसरत आहेत, यामागे काही तांत्रिक आणि आर्थिक कारणे असल्याचे तज्ज्ञ असतात.
युद्धामुळे जागतिक अनिश्चितता वाढली असली तरी अमेरिकन डॉलर अधिक मजबूत झाला आहे. डॉलर इंडेक्समध्ये ०.२ टक्क्यांची वाढ झाल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी सोने खरेदी महाग झाली आहे, परिणामी मागणी घटली आहे.
advertisement
अमेरिकेतील महागाईचे आकडे पाहता, फेडरल रिझर्व्ह (Fed) व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी झाली आहे. जोपर्यंत व्याजदर चढे राहतील, तोपर्यंत सोन्यासारख्या 'बिगर-उत्पन्न' देणाऱ्या मालमत्तेवरील गुंतवणूकदारांचा कल कमी असतो.
आखातामधील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत, ज्यामुळे महागाई वाढण्याची भीती आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदार सोन्यापेक्षा इतर पर्यायांकडे वळत आहेत.
तज्ज्ञांचा अंदाज काय?
बाजार तज्ज्ञांच्या मते, सध्या सोने ५,००० ते ५,३०० डॉलर प्रति औंसच्या दरम्यान स्थिरावले आहे. जर सोन्याने ५,००० ते ५,१०० डॉलरचा महत्त्वाचा 'सपोर्ट' तोडला, तर दरात अजून मोठी घसरण होऊ शकते. मात्र, जर ५,४०० डॉलरच्या वर ब्रेकआऊट मिळाला, तर सोने नवी ऐतिहासिक उंची गाठू शकते.
दुसरीकडे, चांदीच्या दरात गुरुवारी किंचित सुधारणा पाहायला मिळाली. स्पॉट सिल्व्हर ०.१२ टक्क्यांनी वधारून ८५.६५ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. मात्र, सोन्याच्या तुलनेत चांदीची कामगिरी सध्या कमकुवत दिसत आहे.
