रेल्वे अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितले की, ही ट्रेन पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलूचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तूनख्वाच्या पेशावरकडे जात असताना हल्ला करण्यात आला.
BLA चा दावा – ओलीसांमध्ये पाकिस्तानी सैन्याचे जवान
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकारविरोधात दीर्घकाळ लढणाऱ्या BLA या गटाने ट्रेन हायजॅक केल्यानंतर निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी सांगितले की, ओलीसांमध्ये पाकिस्तानी सैन्याचे जवान आणि सुरक्षा एजन्सीचे सदस्य आहेत. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर ओलीसांना गंभीर इजा पोहोचू शकते, असा इशारा BLA ने दिला आहे.
advertisement
BLA ने सांगितले की, त्यांनी ट्रेनमधील महिला, मुले आणि बलूच प्रवाशांना सोडून दिले असून, ओलीस ठेवलेले सर्वजण पाकिस्तानी सैन्याशी संबंधित आहेत.
द बलुचिस्तान पोस्टच्या अहवालानुसार, बीएलएने गेल्या वर्षी 302 हल्ले केले होते ज्यामध्ये 580 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आणि 370 जण जखमी झाले. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) आणि बलुच राजी आजोई संगर (बीआरएएस) सारख्या इतर गटांनीही 2024 मध्ये शेकडो हल्ले केले ज्यामुळे एकूण 1 हजार हून अधिक लोक मृत्युमुखी पडले.
