हा हल्ला म्युनिक येथे गुरुवारी सकाळी 10:30 वाजता झाला. हल्ल्याच्या वेळी युनियनचे आंदोलन सुरू होते आणि मोठ्या संख्येने लोक एकत्र आले होते. अचानक, आरोपी युवकाने वेगाने कार चालवत गर्दीमध्ये घुसवली. यामध्ये लहान मुलांसह अनेक नागरिक जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि आरोपीला अटक केली.
ईडीने माझे 500 ते 700 कोटी जप्त केले; 1 हजार कोटींची संपत्ती सोडून...
advertisement
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी 24 वर्षीय अफगाण युवक असून तो जर्मनीत शरण मागत होता. मात्र, त्याने हा हल्ला का केला याची खात्रीशीर माहिती अद्याप समोर आलेली नाही. हल्ल्यानंतर म्युनिकमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
नवे आयकर विधेयक २०२५: जुन्या आयकर कायद्यापेक्षा वेगळे कसे, काय बदल झाले?
बावेरीया प्रांताचे गव्हर्नर मार्कस सॉडर यांनी या घटनेला ‘हल्ला’ असे संबोधले आहे. तसेच, म्युनिकच्या महापौरांनीही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा म्युनिकमध्ये आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषद सुरू होणार आहे.जर्मनीतील या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
अशाच प्रकारची घटना काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील न्यू ऑर्लियन्स येथे घडली होती. तेव्हा ट्रकने केलेल्या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला होता.
