TRENDING:

'आताच आपापल्यासाठी डांबर तयार...' महामार्ग निर्मितीदरम्यान होणाऱ्या वृक्षतोडीविषयी जितेंद्र जोशीची संतप्त पोस्ट

Last Updated:

जितेंद्र जोशी प्रत्येक विषयावरील आपली भूमिका रोखठोकपणे मांडताना दिसतो. आता नुकतंच जितेंद्रने वृक्षतोडीसंदर्भात एक पोस्ट शेअर करत स्पष्ट मत मांडलं आहे. काय म्हणाला आहे तो जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 16 डिसेंबर :   आपल्या दमदार अभिनयानं आणि लेखणीनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा मराठी अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी. जितेंद्र जोशीच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत, शिवाय सोशल मीडियावर देखील त्याचं जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. जितेंद्र जोशी हा मराठीतील एक उत्तम अभिनेता, होस्ट आणि कवी आहे. त्याने आजवर अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. हा संवेदनशील मनाचा अभिनेता आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना नेहमीच भारावून सोडतो. त्याशिवाय हा अभिनेता नेहमीच सामाजिक विषयांवर भाष्य करताना दिसून येतो. जितेंद्र जोशी प्रत्येक विषयावरील आपली भूमिका रोखठोकपणे मांडताना दिसतो. आता नुकतंच त्याने केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. जितेंद्रने वृक्षतोडीसंदर्भात एक पोस्ट शेअर करत स्पष्ट मत मांडलं आहे. काय म्हणाला आहे तो जाणून घ्या.
जितेंद्र जोशी
जितेंद्र जोशी
advertisement

जितेंद्र जोशी मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. तो मराठी चित्रपटांसोबतच आजवर अनेक हिंदी वेब सिरीजमध्ये झळकला आहे. पण उत्तम अभिनेता असणारा जितेंद्र अनेकदा सामाजिक बांधिलकी जपताना देखील दिसतो. जितेंद्रला आपण आजवर अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झालेलं पाहिलं आहे. ‘पाणी फाऊंडेशन’, ‘नाम’ यांसारख्या संस्थांसाठी त्याने काम केलंय. निसर्गाविषयी त्याची आत्मीयता तो प्रत्येक ठिकाणी मांडताना दिसतो. आताही जितेंद्रने निसर्गाला हानी पोहचवणाऱ्यांचे कान टोचले आहेत. त्याने महामार्ग निर्मितीसाठी केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीबाबत सोशल मीडिया पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

advertisement

आलिशान गाड्या, दुबईत घर; अभिषेक बच्चनपेक्षा कित्येक पटींनी जास्त पैसे कमावते ऐश्वर्या राय; किती आहे नेटवर्थ?

जितेंद्रने या पोस्टमध्ये म्हटलंय की, 'महामार्ग निर्माण करताना झाडांची कत्तल करणाऱ्या लोकांना आपल्या पुढच्या पिढ्या गुदमरताना दिसत नाहीत. झाडांची अमानुष हत्या होऊ देणारे आपण सुद्धा निर्वंश होऊन मारून टाकले जाणार आहोत. आताच आपापल्यासाठी डांबर तयार ठेवू त्याच रस्त्यांखाली झाडांच्या मृतदेहासोबत झोपी जाण्यासाठी.'

advertisement

जितेंद्र जोशीने यापूर्वी देखील फटाक्यांमुळं होणारं वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वृक्षतोड यासारख्या सामाजिक मुद्यांवर भाष्य करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

जितेंद्र जोशीच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर, नुकतंच तो नागराज मंजुळेंच्या 'नाळ 2' चित्रपटात तो झळकला होता. शिवाय ‘गोदावरी’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेचंही खूप कौतुक झालं होतं. नाळ 2 या चित्रपटाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता जितेंद्र जोशी लवकरच रावसाहेब या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मृन्मयी देशपांडे, मुक्ता बर्वे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात जितेंद्र एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे.

advertisement

मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
'आताच आपापल्यासाठी डांबर तयार...' महामार्ग निर्मितीदरम्यान होणाऱ्या वृक्षतोडीविषयी जितेंद्र जोशीची संतप्त पोस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल